मालेगाव आयुक्त संगिता धायगुडे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात बदली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मालेगाव : महानगरपालिका आयुक्त संगिता धायगुडे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालक पदावर बदली झाली आहे.  श्रीमती धायगुडे गेली दीड वर्षापासून येथे कार्यरत होत्या. शहर हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. गैरकारभाराला व कागदोपत्री केल्या जात असलेल्या कामांना लगाम लावला. खासगी स्वच्छता ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्या. म्हाळदे घरकुलात झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर ही त्यांची मोठी उपलब्धी. याकामी महापौर रशीद शेख त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बांधकाम विभागातील बोगस कामांची त्यांनी चौकशी केली होती.

मालेगाव : महानगरपालिका आयुक्त संगिता धायगुडे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालक पदावर बदली झाली आहे.  श्रीमती धायगुडे गेली दीड वर्षापासून येथे कार्यरत होत्या. शहर हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. गैरकारभाराला व कागदोपत्री केल्या जात असलेल्या कामांना लगाम लावला. खासगी स्वच्छता ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्या. म्हाळदे घरकुलात झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर ही त्यांची मोठी उपलब्धी. याकामी महापौर रशीद शेख त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बांधकाम विभागातील बोगस कामांची त्यांनी चौकशी केली होती. कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी यांच्याशी त्यांचे खटके उडत होते. विकास कामांना जाणूनबुजून विलंब करीत असल्याचा नगरसेवकांचा आरोप होता. शहरवासीय मात्र त्यांच्या कामकाजावर खुष होते. त्यांच्या बदलीमुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे.