नाशिक महापालिका आयुक्तपदी राधाकृष्ण गमे,अखेर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नाशिकः नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाली असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासंदर्भातील आदेश(ऑर्डर) आज पारित झाली. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते. याबद्दल नाशिककरांना उत्सुकता होती. गमे यांचे नाव आघाडीवर होते पण तरीही इतर नावे चर्चेत आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर गमे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले. आठवडाभरात ते पदभार स्विकारतील,असे बोलले जात आहे.