Dhule
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule News : धुळे जिल्ह्याचा विकास थांबला: ११७ ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळेना!
Delayed Funds Affect Basic Services in Dhule Villages : आवश्यक लेखापरीक्षण वेळेवर न करणे, ग्रामपंचायत विकास आराखडे (जीपीडीपी) व इअरबुक तक्ते अपलोड करण्यास टाळाटाळ करणे आणि काही ठिकाणी प्रशासक कार्यरत असल्याने या ग्रामपंचायतींना निधीपासून वंचित राहावे लागत आहे.
धुळे: जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधी थांबविण्यात आला आहे. आवश्यक लेखापरीक्षण वेळेवर न करणे, ग्रामपंचायत विकास आराखडे (जीपीडीपी) व इअरबुक तक्ते अपलोड करण्यास टाळाटाळ करणे आणि काही ठिकाणी प्रशासक कार्यरत असल्याने या ग्रामपंचायतींना निधीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे गावातील मूलभूत सोयी-सुविधांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.