काळ्या बाजारात रेशनचा विक्रीसाठी जाणारा १६ क्विंटल गहु ग्रामस्थांनी पकडला

दिगंबर पाटोळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक)  :  चामदरी( दिंडोरी) येथील सतर्क ग्रामस्थांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारेे स्वस्त धान्य दुकानातील १६ क्विटंल गहू पकडून दिला आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकान चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करीत २ लाख ६१ हजार ५२० रुपयांचा एेवज जप्त केला आहे.

वणी (नाशिक)  :  चामदरी( दिंडोरी) येथील सतर्क ग्रामस्थांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारेे स्वस्त धान्य दुकानातील १६ क्विटंल गहू पकडून दिला आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकान चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करीत २ लाख ६१ हजार ५२० रुपयांचा एेवज जप्त केला आहे.

चामदरी येथे शनिवारी (ता. ११) दुपारी साडे बारा वाजता स्वस्त धान्य दुकानातून पिकअप (गाडी क्रमांक एम एच १५ सीके ५०३६ ) मध्ये धान्याचेे कट्टे भरतांना गावातील काही ग्रामस्थांनी बघितले. याबाबत ग्रामस्थांना संशय आल्याने पिकअप गाडीत धान्य भरल्यानंतर गाडी गावाबाहेर जात असतांना ग्रामस्थांनी पिकअपचा पाठलाग करुन पकडली.  गाडीस गावात परत आणले व घटनेची माहिती तालुका पुरवठा अधिकारी व वणी पोलिसांत दिली.

दरम्यान तालुका पुरवठा निरीक्षक रमेश माधवराव पवार हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पिकअपमध्ये रेशन दुकानातील ५० किलो वजनाचे गहु असलेले ३२ कट्टे असे  ११ हजार ५२० रुपये किमंतीचे एकुण १६ क्किंटल गहु आढळून आले. यावेळी पवार यांनी पंचनामा वणी पोलिसांत स्वस्त धान्य दुकान चालक साहेबराव वामन (गरुड, रा. चामदरी) व पिकअप चालक दत्तात्रय निवृत्ती कदम, (रा. कोऱ्हाटे) या दोघा विरुद्द स्वस्त दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जात असल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानूसार पोलिसांनी  ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल व पीकअप सह २ लाख ६१ हजार ५२० चा एेवज जप्त करीत. स्वस्त धान्य दुकानदार साहेबराव गरुड व पिकअप चालक दत्तात्रय कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 16 quintals of wheat going for sale of ration in black market is caught by the villagers