ऑईलचा मालवाहू ट्रक पुलावर कोसळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

सिडको-   इंदिरा नगर बोगद्याजवळ मुंबईहून नाशिक कडे येणारा मालवाहतूक ट्रक  चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली कोसळला मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सिडको-   इंदिरा नगर बोगद्याजवळ मुंबईहून नाशिक कडे येणारा मालवाहतूक ट्रक  चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली कोसळला मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गुरुवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान मुंबईहून नाशिककडे येणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक (एम.पी.०७.एच. बी ८१४२) या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंदिरा नगर बोगद्याजवळ ट्रक पुलावरून खाली कोसळला.त्यात ट्रक चालक सदर कुमार श्रीवास्तव वय (४०),  दीपेन शर्मा वय (३९) शमशाद खान (४३) तिघेही रा. मध्यप्रदेश हे किरकोळ जखमी आहेत. या ट्रकमध्ये ऑईलचे ड्रम असल्याने ट्रक कोसळताच हजारो लिटर  ओईल रस्त्यावर पसरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याने तात्काळ घटनास्थळी वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी येऊन नियंत्रण मिळवले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा