गिरणा धरणात 19.49 टक्के पाणीसाठा

सुधाकर पाटील
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या तिन दिवसापासुन वेगाने वाढ होत असल्याचे चित्र आहे.  काल सायंकाळी सहा वाजता धरणात 15.30 टक्के एवढा पाणीसाठा होता. आज सकाळी हा पाणीसाठा 19.49 टक्के एवढा झाला आहे.

भडगाव : गिरणा धरणात रात्रीतुन मोठी वाढ झाली असुन सकाळी सहा वाजता धरणाचा पाणीसाठा 19.49 टक्क्यांवर पोहचला आहे. तर धरणात 25 हजार क्युसेसने पाण्याचा फ्लो सुरू होता. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरण 30 टक्केपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या तिन दिवसापासुन वेगाने वाढ होत असल्याचे चित्र आहे.  काल सायंकाळी सहा वाजता धरणात 15.30 टक्के एवढा पाणीसाठा होता. आज सकाळी हा पाणीसाठा 19.49 टक्के एवढा झाला आहे. तर पाणलोट क्षेत्रातील धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सकाळी सहा वाजता ठेगोंडा बंधार्यात चणकापुर धरणातुन 9 हजार 334, पुनद धरणातुन 5 हजार 61 क्युसेसने पाण्याचा विसर्ग येत होता. तर ठेंगोडा बंधार्यातुन गिरणा धरणाकडे 17 हजार 10 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. याशिवाय हरणबारी धरणातुन 7 हजार 643 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे धरणात जवळपास 25 हजार क्युसेसने पाण्याचा फ्लो सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या टक्केवारीत सायंकाळपर्यंत मोठी वाढ झालेली पहायला मिळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19.49 percent water storage in Girna Dam

टॅग्स