
Dhule News : येथील साक्री रोड भागातील सत्यसाईबाबा सोसायटी व इच्छापूर्ती कॉलनी येथे साक्रीच्या आमदार मंजुळा गावित व इंजिनिअर सागर गावित यांच्या हस्ते रस्तेकामाचा प्रारंभ झाला. दोन कोटी २२ लाख रुपये निधीतून या भागात ही रस्त्यांची कामे होत आहेत.
सत्यसाईबाबा सोसायटी येथील कार्यक्रमाला राजू महाले अध्यक्षस्थानी होते. (2 Crore 22 Lakh roads in Sakri Road area dhule news)
या वेळी आमदार गावित म्हणाल्या, की विविध कामांच्या माध्यमातून आम्ही आपल्या संपर्कात असतो. या कॉलनीतील रस्त्यांच्या कामाबाबत माझ्याकडे राजेश महाले, भरत शिरसाठ, रणवीरसिंह रजपूत, भरत मिस्तरी, योगेश जगताप यांच्यासह महिलांचे शिष्टमंडळ आले होते. त्यांना कॉलनीत रस्ते लवकरच मंजूर केले जातील, असे आश्वासन दिले होते.
या कामाचा प्रारंभ करून ते आश्वासन पूर्ण करत आहे. या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ६२ लाख रुपये मंजूर करून आणले. हे काम अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले आहेत. या वेळी कॉलनीवासीयांतर्फे आमदार गावित व इंजिनिअर गावित यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच साक्री रोड भागातीलच इच्छापूर्ती कॉलनीस जोडणारा तसेच कॉलनीअंतर्गत नानाभाऊ पाटील यांच्या घरालगत काँक्रिट रस्ते तयार करण्याच्या कामाचाही आमदार गावित व इंजिनिअर गावित यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून धुळे शहरातील विविध विकासकामांसाठी ८५ कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यात इच्छापूर्ती कॉलनीतील रस्त्यांसाठी एक कोटी ६० लाखांचा निधी आहे.
तसेच राजदीप सोसायटी, समृद्धीनगर येथे पथदीप बसविण्यासाठीदेखील प्रस्ताव दिला असल्याचे आमदार गावित यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाला नानाभाऊ पाटील, हर्शल ओतारी, संजय थोरात, स्वप्नील जाधव, सुरेश ओतारी, किशोर पवार, रंगराव खैरनार, गोविंद जाधव, संजय जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.