District Central Bank : म्हसदी परिसरात शेतकऱ्यांना खरीप पीककर्जवाटप

 Loan
Loanesakal

Dhule News : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावीत म्हणून जिल्हाभरात शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वितरण सुरू आहे. (2 crore 40 lakh rupees crop loan distributed to 263 members by District Central Bank dhule news)

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसदी शाखेत म्हसदीसह ककाणी, चिंचखेडे, राजबाईशेवाळी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (ता. २७) दुपारपर्यंत २६३ सभासदांना दोन कोटी ४० लाख रुपये पीककर्ज वितरण झाल्याची माहिती शाखाधिकारी वाय. एस. भामरे-पाटील यांनी दिली.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देणारी बँक ठरली आहे. मार्चअखेरीस परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत विनव्याजी पीककर्ज जिल्हा बँकेतर्फे वितरित केले जाते.

सोमवार (ता. २४)पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखेत शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वितरण सुरू आहे. गुरुवारी दुपारी दोन कोटी ४० लाख रुपये पीककर्ज वितरण झाल्याची माहिती शाखाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दिली. ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कर्ज वितरण सुरू करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 Loan
Plastic Pollution : बॉयलर पेटतो प्लास्टिक कचऱ्याने! लखमापूर परिसरातील वास्तव

या वेळी ज्येष्ठ शेतकरी यशवंतराव बळिराम देवरे, संभाजी काशीराम देवरे, देवीदास निंबा देवरे, दगडू देवरे, शेखर देवरे, केशव बेडसे, विजय शिंदे (ककाणी), देवराव बेडसे (चिंचखेडे) येथील शेतकरी उपस्थित होते.

किसान कार्ड सुविधांमुळे दिलासा

शेतकऱ्यांना किसान कार्ड (मायको एटीएम) एटीएमद्वारे पीक कर्ज वितरण सुरू आहे. म्हसदी, चिंचखेडे, ककाणी, राजबाईशेवाळी येथील चारही गावांतील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ‌व सर्वच संचालकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज वितरण व्हावे यासाठी पाठपुरावा केला. म्हसदी येथील स्थानिक शाखेतील कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस शेतकऱ्यांच्या कर्ज याद्या संगणकावर अद्ययावत केल्या.

सभासदांनी कामाविषयी समाधान व्यक्त केले. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक जे. एन. पाटील, प्रशासन व्यवस्थापक अनिल सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासनीस बी. एम. साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या म्हसदी शाखाधिकारी वाय. एस. भामरे, सहाय्यक सी. वाय. देवरे, सचिव दादाजी बेडसे, काशीनाथ बेडसे, डी. एम. पानपाटील, कैलास वेंदे, राहुल कुलथे, प्रभाकर देवरे, किशोर बेडसे आदींनी सुरळीत कर्ज वितरण प्रक्रियेसाठी प्रयत्न केले

 Loan
Nandurbar News : मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा; परिसरातील 70 अतिक्रमणे हटविली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com