Nandurbar News : मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा; परिसरातील 70 अतिक्रमणे हटविली

JCB removing encroachments.
JCB removing encroachments.esakal
Updated on

Nandurbar News : शहरातील मुख्य रस्त्यावरील वाढलेल्या अतिक्रमणांनी नागरिक त्रस्त झाल्याने तक्रारींवरून येथील पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली आहे. (70 encroachments were removed from main road area nandurbar news)

पंचायत समिती, हाटदरवाजा, मोठा मारुती परिसरातील ७० अतिक्रमणे हटविली. तत्पूर्वी मागील आठवड्यात जाहीर आवाहन केले, तसेच नोटिसा बजावून स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते.

नंदुरबार शहरातील वाढत्या अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी कोणत्या राजकीय दबावाला बळी न पडता मागील आठवड्यात अतिक्रमणधारकांना जाहीर आवाहन करून २४ एप्रिलपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेत रस्ते मोकळे करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्या आवाहनाला न जुमानता नागरिकांनी काहीही होणार नाही, अशा मनसुब्याने कोणतीही हालचाल केली नाही.

पालिकेतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. मात्र रमजान ईद, अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस बंदोबस्त मिळू शकला नाही. त्यामुळे २४ एप्रिलला पुन्हा अतिक्रमणधारकांना पालिकेतर्फे नोटिसा बजावून दोन दिवसांची संधी देण्यात आली. तरीही अतिक्रमणधारक सुस्तावलेलेच राहिले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

JCB removing encroachments.
Nandurbar Grampanchayat Election : शहादा तालुक्यात 49 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी पोटनिवडणूक जाहीर

त्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने गुरुवारी (ता. २७) नंदुरबार पंचायत समिती परिसरात असलेले टपरीधारकांचे अतिक्रमण निर्मूलनास सुरवात केली. जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या काढण्यात आल्या. त्या कारवाईला प्रत्यक्षात सुरवात झाल्याचे पाहताच अतिक्रमणधारकांची मात्र झोप उडाली. त्यांनी धावपळ करीत आपले अतिक्रमण काढण्यासाठी धावपळ सुरू केली.

तोपर्यंत मात्र अनेकांच्या टपऱ्यांची मोडतोड झाली. ते पाहताच अंधारे स्टॉप ते स्टेट बॅंक रस्त्यावर असलेल्या टपरीधारकांनी क्रेन मागवून आपल्या टपऱ्या स्वतःहून काढण्यास सुरवात केली. गुरुवारी दिवसभरात पंचायत समिती, हाटदरवाजा, मोठा मारुती परिसरातील सुमारे ७० अतिक्रमणे हटविली.

JCB removing encroachments.
Summer Heat Rise : उन्हाच्या तडाख्याने शीतपेयांच्या विक्रीत वाढ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.