भरधाव रिक्षा उलटल्याने दोघांचा मृत्यू

auto
auto

एरंडोल : भालगाव येथुन एरंडोलकडे भरधाव वेगाने येणारी रिक्षा चालकाचा ताबा सुटुन उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह अन्य एका प्रवाशाचा मृत्यु झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवीन धारागीर व दादाश्री पेट्रोल पंपा दरम्यान झाला.

>याबाबत पोलिसांनी सांगितले कि आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाना राजु मराठे रा.भालगाव ता.एरंडोल (वय ३५) हा त्याची प्याजो रिक्षा क्रमांक एम.एच.१९-ए.एक्स.९७५९ हिने एरंडोल कडे भरधाव वेगाने येत होता.धारागीर सोडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर रिक्षा समोर अचानक कुत्रा आल्याने त्यास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षाने रस्त्यावरच दोन ते तिन वेळा पलटी घेतली.त्यामुळे रिक्षा चालक नाना राजु मराठे यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला.तर रिक्षातील प्रवासी मिठाराम गजमल मराठे (वय ५०) रा.भालगाव व सुपियाबी शे.जब्बार (वय ५०) रा.भालगाव हे दोन जण गंभीर जखमी झाले.अपघात झाल्याचे समजताच धारागीर,पातरखेडे व भालगाव येथील ग्रामस्थांनी तसेच दादाश्री पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दवाखान्यात दाखल करण्यास मदत केली.

यामध्ये मिठाराम मराठे यांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु झाला.मयत नाना मराठे याचे पश्चात वृद्ध आई व बहिणी असा परिवार असुन मिठाराम मराठे यांचे पश्चात पत्नी आहे.याबाबत रवींद्र दयाराम ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारी वरून रिक्षा चालक नाना मराठे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार राजु पाटील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com