Dhule News : धुळ्यात एकाच दुकानातून दोन टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त

plastic
plasticesakal

धुळे : प्लॅस्टिक (Plastic) वापराबाबतच्या नियमात शिथिलता आणल्याचा गाजावाजा झाल्यानंतर प्लॅस्टिकबंदीविरोधी कारवाईला ब्रेक लागला होता. त्यामुळे शहरात सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सुरू झाला. (2 tons of plastic bags were seized from wholesale shopkeeper by municipal corporation dhule news)

दरम्यान, महापालिकेला याबाबत पुन्हा जाग आल्याने मंगळवारी (ता. ७) धडक कारवाई करून शहरातील ऊस गल्लीतील एका होलसेल दुकानदाराकडून तब्बल दोन टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

संबंधित दुकानदाराला २५ हजार रुपये दंडही करण्यात आला. दरम्यान, एकाच व्यापाऱ्याकडून एकाच वेळी तब्बल दोन टन प्लॅस्टिक पिशव्या सापडतात तर संपूर्ण धुळे शहरात किती साठा असेल याचा विचार केलेला बरा.

राज्यात प्लॅस्टिकबंदी झाल्यानंतर धुळे महापालिकेतर्फे धुळे शहरात कारवाई झाली. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्लॅस्टिकबंदीबाबतच्या नियमात शिथिलता आणली गेल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

plastic
PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांच्या विनवण्या!

त्यामुळे प्लॅस्टिकबंदीविरोधात कारवाई पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी याचा फायदा घेत पुन्हा एकदा शहरात विशेषतः प्लॅस्टिक कॅरिबॅग वापर सर्रासपणे सुरू झाला. दरम्यान, महापालिकेने मंगळवारी (ता. ७) पुन्हा कारवाई केली.

एक लाखाचा साठा

स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ व माझी वसुंधरा अभियान-३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने शहरातील ऊस गल्लीतील श्री हरे कृष्णा या प्लॅस्टिक विक्रेता दुकानावर ही कारवाई केली. यात सुमारे दोन टन प्लॅस्टिक पिशवी जप्त करण्यात आल्या.

छोटा हत्ती वाहन भरून या पिशव्या असल्याचे सांगण्यात आले. साधारण एक लाख रुपये किमतीचा हा साठा आहे. या प्रकरणी संबंधित दुकानदाराला २५ हजार रुपये दंड करण्यात आला.

आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर यांच्या निर्देशनात स्वच्छता विभागप्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, शुभम केदार, मुकादम प्रमोद चव्हाण, रवींद्र धुमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

plastic
Dhule News : पदाधिकारी पती, अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी; महापालिकेतील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com