Start Up : धुळ्यातील स्मार्ट तरुणांची स्टार्ट अपमधील किमया

Start Up
Start Upesakal

धुळे : प्रगतिशील मानसिकतेसह जिद्द, चिकाटी, सचोटी आणि मेहनतीच्या बळावर स्वतःचे नशीब उजळण्यासाठी धडपडणाऱ्या स्मार्ट ३५ तरुणांनी येथील आपल्या २४ स्टार्टअपमधील व्यवसायांचे मूल्य थेट शंभर कोटी रुपयांवर नेले आहे.

फूड डिलिव्हरी ॲपमधील झोमॅटो, स्विगीशी स्पर्धा करत तीन राज्यांसह निरनिराळ्या ७५ तालुक्यांमध्ये पाय रोवण्यापासून ते बुढ्ढी का बाल, पात्री भजीची खवय्यांना गोडी लावण्यापर्यंत संबंधित तरुणांनी उद्योजकतेकडे झेप घेतली आहे.

Start Up
Start up : भरडधान्याची सातासमुद्रापार भरारी

विचारवंत व सीए प्रा. प्रकाश पाठक, सीए श्रीराम देशपांडे आणि डिजिटल स्कूलचे प्रणेते हर्शल विभांडिक यांनी खानदेश उद्योग प्रबोधिनीची स्थापना करत तरुणाईला स्टार्टअपच्या माध्यमातून गिअर-अप करण्याचा चंग बांधला आहे.

त्यात त्यांना चांगले यश लाभत आहे. प्रबोधिनीच्या माध्यमातून तरुण वर्ग आता स्टार्टअपद्वारे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना दिसत आहे. प्रबोधिनीमार्फत दोन प्रकारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्टार्टअपशी निगडित प्रकल्पाबाबत समुपदेश केले जाते. नंतर जाणकार, तज्ज्ञ दहा जणांच्या ग्रुपपुढे त्या प्रकल्पाबाबत संबंधित तरुणाला प्रेझेंटेशन करावे लागते.

समाधान झाल्यावर प्रबोधिनी स्टार्टअप प्रकल्पाला सहकार्यास तत्पर होते. यात अट एकच जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील असो किंवा राज्यातील, त्या उद्यमशील तरुणाला धुळे शहरात कार्यालय थाटावे लागते.

Start Up
Start up : रिवायंडिंग व्यावसायिक ते उद्योजकतेचा यशस्वी प्रवास

२४ स्टार्टअप गिअर-अप

येथील २४ स्टार्टअपमध्ये सरासरी ३५ तरुणांचा समावेश आहे. यात सर्व्हिस बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग, ई-कॉमर्स, फूड प्रोसेसिंग, मेडिकल अशा स्वरूपातील स्टार्टअप प्रकल्पांना पसंती दिली जात आहे. त्यातील व्यवसाय मूल्य शंभर कोटींवर पोचले असून, संबंधित काही प्रकल्पांसाठी प्रबोधिनीमार्फत सरासरी पाच कोटी रुपयांचा पतपुरवठा झाला आहे.

विशेष म्हणजे प्रबोधिनी विनामूल्य समाजसेवेतून तरुणाईला आत्मनिर्भरतकडे नेण्यासाठी धडपडत आहे. आतापर्यंत स्टार्टअपमधून बऱ्याच तरुणांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. प्रबोधिनीने व्यवसायाची अनेक सुरू झालेली नवी दालने, संधी आणि २४ स्टार्टअपमधील तरुणांचे अनुभव जाणून घेता यावेत यासाठी धुळे शहरात २६ ते २८ जानेवारीला व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात राज्यातील यशस्वी उद्योजक उपस्थित राहतील.

असे आहेत स्टार्टअप

फूड डिलिव्हरी ॲपमध्ये झोमॅटो, स्विगी ब्रॅन्ड अग्रेसर आहेत. त्याच्याशी मूळ शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील व धुळे शहरातून कार्यभार सांभाळणारा २४ वर्षीय तरुण हा स्काय-इट ॲपनिर्मितीतून स्पर्धा करीत आहे.

या ब्रॅन्ड कंपन्या केवळ शहरात सेवा देतात. मात्र, स्काय-इट ॲपने जिल्ह्यातील ग्रामीण भागासह निरनिराळे ७५ तालुके, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात ठिकठिकाणी पाय रोवले आहेत. आता सेंधवा, नारायणगाव (पुणे) येथे हे ॲप लॉन्च झाले आहे.

Start Up
Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट!

केच-अप, पिंपळनेर (ता. साक्री) येथील तरुणांकडून बिलवम पात्रा, तसेच क्लाउड कॉटन कॅन्डीअंतर्गत वेगवेगळ्या फ्लेव्हरमधील बुढ्ढी का बाल, महिला सक्षमीकरणांतर्गत गृह व बचतगटांची उत्पादने देशातील महानगरात नेणारे छाया कार्ट, कॅश-बॅकची सुविधा देणारे अर्न नाऊ यासह २४ स्टार्टअप प्रकल्प धुळ्यातून गिअर-अप झाले आहेत.

येथील एमआयडीसीत कांदा, गहू, साखर आदी भरण्यासाठीचे लिनो पीपीई बॅग मॅन्युफॅक्चरिंग युनिटही कार्यरत झाले आहे. उच्च शिक्षित आणि बारावी झालेले तरुण ही किमया साधत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com