बागलाणच्या रस्ते आणि पुलांसाठी २५ कोटी ६७ लाख रूपयांचा निधी मंजूर

satana
satana

सटाणा - बागलाण तालुक्यातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ कोटी ६७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे दिली.

याबाबत बोलताना आमदार सौ. चव्हाण म्हणाल्या, सन २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर बागलाण तालुक्याचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहे. तालुक्यातील जनतेला दळणवळणाच्या दृष्टीकोणातून दर्जेदार रस्ते निर्माण करणे. शेतकर्‍यांचा शेतीमाल गुजरात राज्यातील सूरत, बडोदा अहमदाबाद तसेच मुंबई, नाशिक येथे विक्रीसाठी वेळेवर पोहच करता यावा यासाठी चांगले रस्ते असणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी २५ कोटी ६७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच ब्राह्मणपाडे येथील जनतेची गेल्या १० वर्षांपासून असलेल्या मोसम नदीवर पुलाच्या बांधकामाच्या मागणीनुसार नाबार्ड कडूनही कामे मंजूर झाली आहेत.

तालुक्यातील मोसम खोर्‍यातील श्रीपुरवडे, वडेखुर्द, टिंगरी, वाघळे, उत्राणे, राजपुरपांडे येथील शेतकरी व ग्रामस्थांना पावसाळ्यात पाच किलोमीटर वळसा घालून जावे लागत होते. आता ब्राह्मणपाडे येथील मोसम नदीवर मंजूर झालेल्या पूलामुळे जनतेची मोठी सोय होणार आहे. या सर्व कमांच्या निविदा डिसेंबर अखेर काढण्यात येऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील उर्वरित रस्ते व पुलांची कामे मार्च २०१९ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाविष्ठ करून घेतली जातील. दिलेल्या सर्व आश्वासनांची वचनपूर्ती करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील असल्याचेही आमदार सौ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मंजूर झालेली रस्ते व पूलांची कामे पुढीलप्रमाणे : 
नामपुर – सारदे रस्त्याची सुधारणा करणे (३.५० कोटी), मानूर – साल्हेर – वाघंबा रस्त्याची सुधारणा करणे (१ कोटी), काठरेदिगर – डांगसौंदाणे – सटाणा – मालेगाव रस्त्याची करंजखेड गावापासुन वडाचा पाडापर्यंत सुधारणा करणे (१.१० कोटी), काठरेदिगर – कुत्तरबारी – डांगसौंदाणे – सटाणा रस्त्याची सुधारणा करणे (१ कोटी), नंदुरबार – साक्री – नामपुर – मालेगाव रस्त्यावर खालचे टेंभे गावाजवळ जलनिस्सारण संरक्षक भिंत व कोंक्रीटी गटारचे बांधकाम करणे (२ कोटी), अजमेर सौंदाणे – वायगाव – रावळगाव – झोडगा या राज्य मार्गावरील रस्त्याची सुधारणा करणे (१.७० कोटी), केरसाने – मुंगसे – मुल्हेर या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे (१ कोटी), सटाणा – दोधेश्वर रस्त्याची सुधारणा करणे (८० लक्ष), आराई – वासोळ रस्त्याची सुधारणा करणे (१.७० कोटी), साल्हेर – तताणी – डांगसौंदाणे या रस्त्याची सुधारणा करणे (१ कोटी) या कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यात ब्राह्मणपाडे – श्रीपुरवडे रस्त्यावरील मोसम नदीवर पुलाच्या बांधकाम करणे (३.८७ कोटी) व धुळे जिल्हा हद्द ते बोर्‍हाटे – माळीवाडे – गोळवाड – अलियाबाद या राज्य मार्गाचे रुंदीकरण करणे (७ कोटी) या कामांना मंजूरी मिळाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com