भुसावळला तवेरा गाडीतून 25 लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

भुसावळ - शहरातील यावल नाक्‍यावर तवेरा गाडीमधून तब्बल 25 लाखांची रोकड जप्त केल्याची कारवाई आज भरारी पथकाने केली. विशेष जप्त केलेल्या रोकडमध्ये सर्व दोन हजारांच्या नव्या नोटा आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

पालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत हे "घबाड' हाती आले आहे. प्राप्त माहितीनुसार तवेरा (एमएच 19/एएक्‍स 2478) यावल नाक्‍यावरून जात असताना भरारी पथकाचे प्रमुख आर. व्ही. महाडिक, सहायक व्ही. आर. चव्हाण, तलाठी व्ही. आर. जठार, बी. आर. बडगुजर आणि पोलिसांच्या पथकाने गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीत 25 लाख रुपयांची रोकड कोणत्याही कागदपत्रांशिवाय आढळून आली. ही रक्कम पथकाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी जप्त केली. जळगाव येथील अरुण आर्या हे या गाडीतून ही रक्कम सावद्याहून जळगावकडे घेऊन जात होते. दरम्यान, जप्त केलेली रक्कम कशाची आहे, याबाबत चौकशी केली जाणार असून, त्यासाठी आयकर विभागाला माहिती देण्यात आलेली आहे.

Web Title: 25 lakh cash seized Tavera car Bhusawal

टॅग्स