Dhule News : अडीचशे वाहनधारकांचे लायसेन्स निलंबित; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने कारवाई

Driving Licence New Rules
Driving Licence New Rulesesakal

धुळे : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या अकरा महिन्यांत २४७ वाहनधारकांची अनुज्ञप्ती (license) तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. (2500 vehicle drivers license suspended Proceedings for Violation of Motor Vehicle Act dhule news)

शहर वाहतूक शाखेकडून १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, चालत्या वाहनांवर मोबाईलवर संभाषण करणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे इत्यादी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांच्या कृतीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होत असते.

वाहनधारकांनी अशा प्रकारची कृती पुन्हा करू नये यासाठी अशा २४७ वाहनधारकांची अनुज्ञप्ती (लायसेन्स) तीन महिन्यांसाठी निलंबन करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Driving Licence New Rules
Abhay Yojana : दोन मोबाईल टॉवर, एक गाळा सील; मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने कारवाई

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडील ८ मार्च २०२३ च्या पत्रान्वये मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा एकूण २४७ वाहनधारकांच्या अनुज्ञप्ती (लायसेन्स) तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित केल्याबाबत कळविले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

दरम्यान, शहरातील वाहनधारकांनी विनाहेल्मेट वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, चालत्या वाहनांवर मोबाईलवर संभाषण करणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे याद्वारे मोटर कायद्याचे उल्लंघन होऊन आपल्या व इतरांच्या जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. बारकुंड यांनी केले आहे.

Driving Licence New Rules
Agriculture University : कृषी विद्यापीठ निर्मितीत खोडा घालण्याचा प्रयत्न; प्रा. शरद पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com