video : एक दिवा पेटवला शहिदांसाठी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

धुळे : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी आज येथे "एक दिवा शहिदांसाठी' हा कार्यक्रम झाला. जिल्हा खानदेश विद्यार्थी संघटनेतर्फे कमलाबाई शाळेजवळ हा कार्यक्रम झाला. 

 

धुळे : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी आज येथे "एक दिवा शहिदांसाठी' हा कार्यक्रम झाला. जिल्हा खानदेश विद्यार्थी संघटनेतर्फे कमलाबाई शाळेजवळ हा कार्यक्रम झाला. 

 

मुंबई हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी व लाखो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी संघटना व मधुश्री प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम झाला. महापौर चंद्रकांत सोनार, डॉ. संजय शिंदे, जगदीश देवपूरकर, सुनील देवरे, मयूर अहिरराव, सुधीर पोतदार, पी. आय. उपासे, मनोज वाघ, प्रमोद मुंडके, गिरीश चौधरी, संतोष चौधरी, वाल्मीक जाधव, नरेश चौधरी, किशोर सरगर, आनंद तायडे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश बाविस्कर, अनिल पिंगळे, माधव विसपुते, रविराज चव्हाण, महेंद्र सोनार, गिरीश मोरे, डी. बी. सोनार, अनिल विसपुते, संजय वेल्हणकर, लक्ष्मण अजळकर, प्रीतेश बाविस्कर आदींनी संयोजन केले. 

ओंकार बहुउद्देशीय संस्था 
मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना ओंकार बहुउद्देशीय संस्थेत श्रद्धांजली वाहण्यात आली. ओंकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव शुभांगी निकम, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. ए. अहिरराव, डी. फार्मसीचे प्राचार्य सागर जाधव आदी उपस्थित होते. 

 
नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे शहीदांना आदरांजली
नंदुरबार : येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलिस दलातर्फे संविधान दिन व मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली वाहण्याचा कार्यक्रम झाला. यावेळीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संविधानाची शपथ दिली. त्यानंतर मुंबईचा २६ -११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी,पोलिस उपअधिक्षक (गृह) सिताराम गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले,जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार,पोलिस निरीक्षक मुंगसे, मुख्यालय राखीव पोलिस निरीक्षक राजपूत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26/11 mumbai attack shahid aadranjali dhule nandurbar