accident
accident

चाळीसगाव : कंटेनर-ओमनीच्या धडकेत तीन ठार

मेहुणबारे (धुळे) : चाळीसगाव-धुळे महामार्गावरील चिंचगव्हाण फाटा ते दहीवद फाट्यादरम्यान कंटेनर व ओमनी गाडीची समोरासमोर धडक झाली. यात दहीवद (ता.चाळीसगाव) येथील दोन तर चिंचगव्हाण येथील एक असे तीन जण जागीच ठार झाले तर त्यातील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना काल (ता. 3) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

चाळीसगाव-धुळे महामार्गावर असलेल्या चिंचगव्हाण फाटा ते दहीवद फाट्यादरम्यान आज सायंकाळी साडेसहाला धुळ्याकडून येणाऱ्या ओमनीत चार जण बसले होते. त्यातील एकाला चिंचगव्हाण फाट्यावर सोडण्यासाठी आलेल्या ओमनी क्रमांक (MH. J 06 - 9700) व धुळेकडे जाणारा मालवाहू दहा टायर कंटेनर (क्रमांक NL.01 - AB 5431) यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघात चिंचगव्हाण येथील दादाभाऊ पंडीत बागुल (वय 45) व दहीवद येथील भुषण सुभाष वाघ (वय 24) गोकुळ पंडीत केदार (वय 52) तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. विजय बागुल हा गंभीर जखमी झाला तेथे वेळेवर 108 व 102 ही सेवा न मिळाल्याने ग्रामस्थांचा संताप होत होता. तब्बल एका तासाने घटनास्थळी रूग्णवाहीका आली. यातील जखमी विजय बागुल याच्या एका हाताला व एका पायाला गंभीर ईजा झाली आहे. अपघात इतका भीषण होता की, यात ओमनीचा पुढील भागचा पूर्ण चुरा झालेला आहे. कंटेनर हा रस्त्याच्या कडेला उतरून गेला आहे. या घटनेची माहिती चिंचगव्हाण गावात व दहीवद येथे समजताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

घटनास्थळी पोलिस दाखल 
या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना कळताच घटनास्थळी साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलिसांना तातडीने रवाना केले. जवळपास आर्धातास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. उपनिरीक्षक नाजिम शेख, हेमंत शिंदे, भटु पाटील, रवि पाटील, प्रताप मथुरे यांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

चिंचगव्हाण व दहीवद गावावर शोककळा
चिंचगव्हाण येथील दादाभाऊ बागुल हा घरातील कर्तापुरूष होता. घराची परिस्थिती एकदम हालाखाची होती. या घटनेने चिंचगव्हाण गावावर शोककळा पसरली आहे. दहीवद येथील गोकुळ केदार यांची घराची परिस्थिती जेमतेम होती ते  तलाठीच्या हाताखाली काम करून कुटुंबाचा गाडा चालवत होता. भुषण वाघ या तरुणाला नोकरी नसल्याने ओमनी चालवुन घर संसाराला हातभार लावत होता. दहीद येथील दोन जण गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com