धुळे : छडवेलला विधवा महिलेच्या घरी लुट; 3 लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

burglary

धुळे : छडवेलला विधवा महिलेच्या घरी लुट; 3 लाखांचा ऐवज लंपास

निजामपूर (जि. धुळे) : माळमाथा परिसरातील छडवेल (ता.साक्री) येथील भारतीबाई पाटील (वय-६१) ही विधवा महिला आपल्या मुलीकडे बाहेरगावी गेलेली असताना त्यांच्या राहत्या घरातून चोरट्याने ४ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून तीन लाख १३ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. घराच्या दोन्ही दरवाज्यांच्या कड्या सहीसलामत असल्याचे समजते. याबाबत भारतीबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात रविवारी (ता.१०) गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू व उपनिरीक्षक दीपक वारे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा: सत्तेसाठी फडणवीसांचा जीव गुदमरतोय, 'या' नेत्याने केली टीका

भारतीबाई पाटील या आपला मुलगा व दोन नातवंडांसह आपल्या मुलीकडे पिंपळखेडा येथे कामानिमित्त गेलेल्या होत्या व राहत्या घराची चावी शेजाऱ्यांकडे देऊन गेल्या होत्या. १० एप्रिलला दुपारी दोन वाजता घरी परतल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोरट्यांनी लहान कपाटाचा रॉड कापून कपाटातील दोन वेगवेगळ्या पाकीटांमधून १३ हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. दुसऱ्या कप्प्यातून ८० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत, ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ८० हजार रुपये किमतीची सोन्याची माळा, प्रत्येकी २० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व २० हजार रुपये किमतीची सोन्याची डोरल्याची पोत व १३ हजार रुपये रोख रकमेसह सुमारे एकूण ३ लाख १३ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

हेही वाचा: बालविवाहविरोधात काम करण्याची गरज : डॉ. प्रमोद पांढरे

Web Title: 3 Lakh Looted From Burglary In Chadwell North Maharashtra News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dhuleuttar maharashtra
go to top