'ओबीसी'साठी तीन हजार कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नाशिक - इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र विमुक्त जाती-भटक्‍या जमाती, इतर मागास आणि विशेष मागासप्रवर्ग मंत्रालयाची स्थापना केली. मात्र या विभागासाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद केल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात कपात सूचना मांडली होती. त्यावर विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या विभागाकरिता दोन हजार 963 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती लेखी पत्राद्वारे भुजबळ यांना दिली. विशेष मागासप्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भुजबळ यांनी केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3000 crore rupees for OBC