गिरणा धरणात 31 टक्के पाणीसाठा

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पिलखोड (ता. चाळीसगाव) : हरणबारी धरणापाठोपाठ गुरूवारी (ता. 16) केळझर धरणदेखील ओव्हरफ्लो झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणेच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ अपेक्षित आहे. धरणात सध्या 31 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : हरणबारी धरणापाठोपाठ गुरूवारी (ता. 16) केळझर धरणदेखील ओव्हरफ्लो झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणेच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ अपेक्षित आहे. धरणात सध्या 31 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली.

राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. त्याची फलश्रृती म्हणून गुरूवारी (ता. 16) केळझर धरण ओव्हरफ्लो झाले. त्यातून1 हजार 100 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. आठवड्यापूर्वी हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले; त्यातूनही सध्या 3 हजार 689 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. चणकापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यातून सध्या 7 हजार 498 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. या तिन्ही धरणांमधून सुमारे बारा हजार क्यूसेक्स विसर्ग गिरणात होत आहे. त्यामुळे गिरणाच्या साठ्यात आज दिवसभरात चांगली वाढ अपेक्षित आहे.

सध्या गिरणा धरणात 5 हजार 685 दशलक्ष घनफूट जीवंत साठा शिल्लक असून 31 टक्के भरले आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली. 

मन्याड धरणात मृतसाठा

चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मन्याड धरणात मृतसाठा शिल्लक आहे, अशी माहिती सहायक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. मन्याड धरणावरील माणिकपुंज धरणात देखील मृतसाठा शिल्लक आहे. मन्याड भरण्याच्यादृष्टीने माणिकपुंड भरणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्या भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.   

तालुक्यातील धरणांमध्येही ठणठणाट

खडकीसिम............ 9.13%

वाघळी (1)................19%

पिंप्री उंबरहोळ................... 0%

ब्राम्हणशेवगे............0%

पिंपरखेड..................0%

कुंझर (2).......................0%

वाघळी (2)..................24.97%

बोरखेडा....................0%

वलठाण....................0%

राजदेहरे....................0%

देवळी-भोरस..............0%

पथराड......................0%

कृष्णापुरी..................1.38%

हातगाव (1)..................0%

Web Title: 31 percent water storage in Girna dam