Nandurbar: मद्यपी वाहनचालकांविरुद्ध 348 गुन्हे दाखल; नंदुरबार जिल्हा पोलिसांची 4 महिन्यांतील धडक कारवाई

Drink-driving
Drink-drivingesakal

Nandurbar : अपघातांचे वाढत्या प्रमाणावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातीत मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश तालुकास्तरावर अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार गेल्या चार महिन्यांत ही मोहीम अधिक तीव्र करीत ३४८ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. (348 cases filed against drunk drivers Nandurbar district police strike action in 4 months)

सण-उत्सवादरम्यान काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. तसेच मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तसेच दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा व्यक्तींविरुद्ध व दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाईबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान ४४ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

११ एप्रिल ते ९ मे २०२३ या कालावधीमध्ये पुन्हा ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. यात नंदुरबार शहर पोलिस ठाणे २३, उपनगर पोलिस ठाणे ७, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे ५,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Drink-driving
Crime News : अमरावतीत अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गळा चिरून खून; मित्र जखमी अवस्थेत...

नवापूर पोलिस ठाणे १२, विसरवाडी पोलिस ठाणे १३, शहादा पोलिस ठाणे २७, धडगाव पोलिस ठाणे १३, म्हसावद पोलिस ठाणे १०, सारंगखेडा पोलिस ठाणे १४, अक्कलकुवा पोलिस ठाणे २३, तळोदा पोलिस ठाणे १४, मोलगी पोलिस ठाणे ५ असे एकूण १६६ गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.

परवाना निलंबनाचे प्रस्ताव

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मद्यपान करून वाहन चालविताना आढळलेल्या वाहनचालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

"दारू पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जीवितासदेखील धोकादायक आहे. नागरिकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये. मद्यपान करून वाहन चालविताना कोणी चारचाकी व दुचाकीस्वार आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई भविष्यातही अशीच सुरू राहील."

-पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक

Drink-driving
Nashik Crime : कारचालकास गुंगीचे औषध देऊन लुटणार्यास अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com