मनपा शाळांमध्ये ३८१ सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षाव्यवस्था नाही, तसेच शाळेत शिक्षक हजर राहत नाहीत. मुख्याध्यापक नसतात, विद्यार्थीही वर्गात बसत नाहीत यांसारख्या शिक्षणासंदर्भातील विविध तक्रारींना आळा बसणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या १२७ शाळांमध्ये प्रत्येकी तीन असे ३८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वशिक्षा अभियानातून देखभाल दुरुस्तीसाठी शाळांना प्राप्त झालेल्या निधीतून हा खर्च होणार आहे.

काही वर्षांत महापालिकेच्या शाळांसंदर्भात अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यात शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक हजर राहत नाहीत, तसेच किरकोळ चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असल्याची मुख्य तक्रार आहे. कामटवाडे शाळेत दोन मुले काही दिवसांपूर्वी हरवली होती. रात्री अकराच्या सुमारास ती मुले सापडल्यानंतर शाळेचा रस्ता चुकल्याने हरविल्याचा प्रकार समोर आला होता. काही भागातील शाळांमध्ये टवाळखोरांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा अनुदान निधी व देखभाल दुरुस्ती निधीसाठी प्रत्येक शाळेला १३ हजार रुपयांचा निधी वर्ग केला आहे. दुरुस्तीचा खर्च महापालिकेतर्फे होत असल्याने त्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी केंद्रप्रमुख, शिक्षक संघटना व मुख्याध्यापकांच्या सभेत मांडला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जूनमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होणार आहे. शहरात महापालिकेच्या १२७ शाळा आहेत. एका शाळेसाठी तीन कॅमेरे दिले जातील. मुख्याध्यापकांचे कार्यालय, शाळेचा व्हरांडा तसेच मैदान असे तीन ठिकाणी कॅमेरे बसतील.

महापालिकेच्या शाळांसंदर्भातील वाढलेल्या तक्रारी, तसेच बाहेरील व्यक्तींच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सर्वशिक्षा अभियानातून प्राप्त निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
-नितीन उपासनी, प्रशासन अधिकारी, महापालिका

Web Title: 381 CCTVs in Municipal Schools