Crime : अत्याचारानंतर चिमुकलीला ठार करणाऱ्या महिलेसह 4 नराधमांना अटक

Nandurbar Latest Crime News
Nandurbar Latest Crime Newsesakal
Updated on

नंदुरबार : येथील रेल्वेस्थानकावर रडत उभ्या असलेल्या दोनवर्षीय बालिकेस महिलेसह चौघांनी उचलून नेऊन तिच्यावर रात्री अत्याचारानंतर (Rape) गळा आवळून खून (Murder) केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिलेसह चौघांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. (4 arrested including woman who killed minor girl after rape nandurbar Crime News)

५ जुलै २०२२ ला सकाळी सातच्या सुमारास नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षालगतच्या शौचालयाच्या टाकीत पाण्यावर लहान बालिकेचा (वय अंदाजे २ वर्षे) मृतदेह आढळला होता. पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी या घटनेबाबत पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांना कळवून चिमुकलीचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

शवविच्छेदनाचा अहवाल गुरुवारी (ता. ७) प्राप्त झाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचार व खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यात आला.

नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात फिरणाऱ्या महिलेकडे ३ जुलै २०२२ सायंकाळी अंदाजे दोन वर्षे वयाची लहान मुलगी होती व तिच्यासोबत आणखी तीन ते चार जण फिरत होते, अशी गुप्त बातमी पोलिस अधीक्षक पाटील यांना मिळाली होती.

पोलिस निरीक्षक कळमकर यांच्यासह पथकाने शहरातील कंजरवाडा, रेल्वेस्थानक व आजूबाजूच्या परिसरात संशयित महिलेचा शोध घेतला. नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाखाली एका कॉलमच्या आडोशाला एक महिला बसलेली दिसली. त्याचे वर्णन संशयित महिलेच्या वर्णनाशी मिळतेजुळते असल्याने तिला ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक पाटील यांनी महिला पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या समक्ष संशयित महिलेकडे विचारपूस केली असता तिच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली.

तिचा पती रणजित पवार, तसेच रवींद्र पावरा, मुकेश आर्य असे चलथान (गुजरात) येथून नंदुरबारला येत असताना चलथान परिसरात संशयित महिलेस लहान मुलगी रडताना दिसल्याने संशयित महिलेने व तिच्यासोबत असणाऱ्यांनी मुलीस उचलून रेल्वेने नंदुरबार येथे आणले. कंजरवाडा परिसरात मद्यप्राशन केले. त्यांनी रात्री पुन्हा मद्यप्राशन केले व रेल्वेस्थानकाकडे निघाले. त्या वेळेस त्यांच्यासोबत असलेली चिमुकली झोपी गेली होती.

रात्री रणजित, रवींद्र, मुकेश यांनी तिला रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षालगत असलेल्या सेफ्टी टँकजवळील भागात आणले. त्या वेळी संशयित महिला रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवत होती. तिचा पती रणजित पवार याने चिमुकलीवर अत्याचार केला. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या चिमुकलीचा रणजितने गळा आवळून खून केला. त्यानंतर सर्वांनी मिळून मृतदेह रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षालगतच्या सेफ्टी टँकमध्ये फेकून दिला. संशयित महिलेस विचारपूसदरम्यान महिलेचा पती रणजित दीना पवार नवापूर येथे असल्याची माहिती मिळाली. नवापूर पोलिसांनी रणजितला

Nandurbar Latest Crime News
Latest Crime News : द्वारका भागातून जुगाऱ्यांना अटक

नवापूर शहरातून ताब्यात घेतले, तर मुकेश नारायण आर्य व रवींद्र विजय पावरा यांना नंदुरबार येथून ताब्यात घेतले. संशयित महिलेने दिलेल्या माहितीची रणजित, मुकेश व रवींद्र यांच्याकडून खात्री केली असता त्यांनीदेखील गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली.

गुन्ह्यातील संशयित ः महिला, रणजित दीना पवार (वय ३८, रा. नागसर, ता. नवापूर, जि. नंदुरबार, ह.मु. नवापूर, मुकेश नारायण आर्य, (२५, रा. धनोरा, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश), रवींद्र विजय पावरा (२५, चिकलटी फाटा, शेलकुवी, ता. धडगाव, जि. नंदुरबार). या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Nandurbar Latest Crime News
शिवसेना संपू नये, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाची : छगन भूजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com