सर्पमित्राच्या मृत्यूप्रकरणी चौघा तरुणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नाशिक - विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झालेला पंजाबचा सर्पमित्र विक्रमसिंग मलौत प्रकरणात घटनेवेळी त्याच्यासोबत असलेल्या भावासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. प्रारंभी पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात ही घटना पिंपळगाव खांब येथील बंगल्यात घडली. न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

जसविंदरसिंग सेवासिंग, साहिल नरेश माथूर (दोघे रा. श्री अनंतपूर साहिब, जि. रूपनगर, पंजाब), मयूर वानखेडे (रा. पाथर्डी, नाशिक), गणेश दत्तात्रय गाडेकर (रा. सामनगाव, नाशिक रोड), बाळू संतू बोराडे (पिंपळगाव खांब), ज्ञानेश्‍वर सोनार (रा. त्र्यंबकेश्‍वर), शरद सायखेडकर (रा. त्र्यंबकेश्‍वर), योगेश पवार (रा. नाशिक), मुकेश चव्हाण अशी संशयितांची नावे असून, मृत विक्रमसिंग मलौत याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला. त्यातील मयूर वानखेडे, गणेश गाडेकर, बाळू बोराडे, मुकेश चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: 4 Youth Arrested by Snake Friend Death Crime