गिरणा धरण भरले 45 टक्के 

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पिलखोड(ता. चाळीसगाव)- धरण 39 टक्के भरेपर्यंत आवक मंदावली होती. मात्र, 21 ऑगस्टला चणकापूरच्या विसर्गामध्ये वाढ केल्यानंतर धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. धरण साठ्याने काल (23 ऑगस्ट) दिवसअखेर 45 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे, अशी माहिती उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली आहे.

20 ऑगस्टला धरण 39 टक्के भरल्यानंतर आवक कमी झाली होती. मात्र, 21 ऑगस्टला चणकापूरमधून 4 हजार 499 क्यूसेक विसर्गात वाढ करण्यात आला होता. यामुळे चणकापूर व ठेंगोडा बंधाऱ्याचे एकत्रित 8 हजार 939 क्यूसेक विसर्ग गिरणात सुरू होता. त्यामुळे गिरणाच्या साठ्यात दररोज एक-एक टक्क्यांनी वाढ झाली. काल(23ऑगस्ट) दिवसखेर गिरणाच्या साठ्याने 45 टक्क्यांची पातळी ओलांडली असून 8 हजार 326 दशलक्ष घनफुट जिवंत साठा निर्माण झाला आहे. 

Web Title: 45 percent water in girna dam