सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टची ५ लाखांची पूरग्रस्तांसाठी मदत

wani
wani

वणी (नाशिक) - केरळ राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणीकामी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केली आहे. 

सप्तश्रृंगी गडावरील श्री. सप्तश्रृंगी निवासिनी देवी न्यासाच्या विश्वस्त संस्थेने स्वयमंस्पुर्तीने विश्वस्त मंडळाच्या सभेची मान्यता घेवून केरळ पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणीकामी सामाजिक दातृत्व म्हणून पाच लाखांचा धनादेश जिल्हा न्यायधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती यु.एम.नंदेश्वर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्त करण्यात आला. यावेळी कळवणचे तहसिलदार तथा विश्वस्त कैलास चावडे, अॅड. अविनाश भिडे, अॅड. जयंत जायभावे, राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. रावसाहेब शिंदे, न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे,  कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर आदीच्या उपस्थित होते.

यापूर्वी देखील विश्वस्त संस्थेने विविध सामाजिक, पर्यावरण, आध्यात्मिक व समाजभिमुक उपक्रम आयोजित करत आपले सामाजिक दातृत्व जपलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com