Dhule Crime News : शिरपूर- इंदूर बसमधून 5 पिस्तुले जप्त

सांगवी पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे दाखवताना पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर, सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट आदी.
सांगवी पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे दाखवताना पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर, सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट आदी. esakal

शिरपूर : शिरपूरकडून मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशाकडून पाच गावठी पिस्तूले, चार मॅगझीन सांगवी पोलिसांनी जप्त केली. गुरुवारी दुपारी केलेल्या या कारवाईत पंजाबमधील संशयिताला अटक करण्यात आली.(5 pistols seized from Shirpur Indore bus Dhule Latest crime news)

बसमधून पिस्तुलाची वाहतूक सुरू असल्याबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना माहिती मिळाली होती. त्यांनी गुरुवारी दुपारी पोलिस ठाण्यासमोर नाकाबंदी केली. इंदूरकडे निघालेली मध्यप्रदेशची बस (एमपी ११ पी ६६६९) थांबवून बस वाहकाला पोलिसांनी शिरपूरहून कोणते प्रवासी बसले याबाबत विचारणा केली.

त्याने माहिती दिल्यावर एकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची झडती घेतल्यावर गावठी बनावटीची पाच पिस्तुले व चार मॅगझीन आढळल्या. त्याचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला.

या मुद्देमालाची एकूण किंमत ७३ हजार ५०० रुपये आहे. संशयित रितेश श्यामलाल शर्मा (वय २४) सोलीपेंड (जि.जालंधर, पंजाब) येथील रहिवासी आहे. त्याने पिस्तुले कुणाकडून घेतली, ती कुणाला विकणार होता, पिस्तुले बाळगण्याचा उद्देश काय याचा तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

सांगवी पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे दाखवताना पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर, सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट आदी.
Dhule Crime : नशेच्या गोळ्यांची विक्री; संशयित तरुणावर गुन्हा

पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार संजय सूर्यवंशी, पवन गवळी, मंगेश मोरे, पोलिस नाईक आरिफ पठाण, संदीप शिंदे, संदीप ठाकरे, शेखर बागूल, कृष्णा पवार, शिवाजी वसावे, मुकेश पावरा, सईद शेख, महिला पोलिस सुनीता पवार, नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, श्री. रणदिवे, श्री. बागले, श्री. पावरा श्री. कोळी, श्री. चव्हाण, श्री. पाटील यांनी ही कारवाई केली.

सांगवी पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे दाखवताना पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर, सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट आदी.
Dhule Crime News : नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह हाती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com