अल्पवयीनांसाठी ५० सीसीचे वाहन उपलब्ध करून देणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

जळगाव - अल्पवयीन तरुणांना वाहन परवाना मिळण्यासाठी आवश्‍यक असलेली चाचणी देण्यासाठी ५० सीसीचे वाहनच उपलब्ध नसल्याने हे तरुण परवान्यापासून वंचित राहतात. त्यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तरुणांना आरटीओ कार्यालयात चाचणीसाठी वाहन उपलब्ध करून देणार आहे. 

‘सकाळ’ने आजच्या (९ डिसेंबर) अंकात ‘अल्पवयीन तरुण वाहनपरवानाशिवाय रस्त्यावरून सुसाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली. १६ ते १८ वर्षे वयोगटातील तरुणांसाठी विदाऊट गिअर ५० सीसी क्षमतेपर्यंतच्या वाहनासाठी परवाना देण्याची तरतूद आहे. मात्र, वाहन उत्पादक कंपन्यांनी ५० सीसीपर्यंतच्या क्षमतेची वाहने बंद केली असून, आता सर्व वाहने ८० सीसी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेची असल्याने या तरुणांना परवान्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

‘मनसे’ने या अडचणीची दखल घेत तरुणांना चाचणीसाठी वाहन उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ५० सीसी क्षमता असलेली जुनी ‘सनी’ हे मोपेड सर्वांगाने दुरुस्त व चालविण्यायोग्य करून हे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चाचणीसाठी संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून ही सुविधा उपलब्ध असेल, असे य‘मनसे’चे जमील देशपांडे यांनी कळविले आहे.

Web Title: 50 cc vehicle will be made available to minors