गिरणा धरणावरील ५६ खेडीनळ पाणी पुरवठा विस्कळीत 

संजीव निकम
गुरुवार, 21 जून 2018

नांदगाव - गिरणा धरणावरील बहुचर्चित ५६ खेडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना पुन्हा एकदा विस्कळीत झाला असून, त्यामुळे आवर्तनाचा कालावध लांबल्याने  योजनेवरील गावांना होणाऱ्या नियमित पाणी पुरवठा व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. शिवाय योजनेवर विसम्बुन असणाऱ्या शहराला पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. 

नांदगाव - गिरणा धरणावरील बहुचर्चित ५६ खेडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना पुन्हा एकदा विस्कळीत झाला असून, त्यामुळे आवर्तनाचा कालावध लांबल्याने  योजनेवरील गावांना होणाऱ्या नियमित पाणी पुरवठा व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. शिवाय योजनेवर विसम्बुन असणाऱ्या शहराला पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. 

ग्रामीण व शहरी भागातील पाण्यासाठी चातकासारखी वाट पहावी लागते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीष पवार यांनी गेल्या वर्षी योजनेच्या पाणी पुरवठा व त्यासाठीची वितरण व्यवस्थेत सुधार करण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. शिवाय नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी आमूलाग्र बदल केल्याने शहरात पंधरा दिवसासाठीचा होणारा पाणीपुरवठा पाच ते सहा दिवस आड झाला. मात्र सुधारणेतील कालावधीची नवलाई संपली व आता शहरासह ग्रामीण भागात भागाला आर्तन लांबू लागल्याने नव्या पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा जून पासून वारंवार वीज पुरवठा खंडित होऊ लागल्याने गिरणा धरणातल्या विहिरीतून होणारा उपसा विस्कळीत झाल्याने नवे पांझण येथील योजनेवरच्या मुख्य जलकेंद्रात पाण्याचा परिणाम झाला. परिणामी योजनेतुन नांदगाव शहर व तालुक्यातील सतरा गवे व वाड्यावस्त्या तसेच मालेगाव तालुक्यातील एकूण एकोणचाळीस गावांना होणारा पाणी पुरवठाचा कालावधी वाढला आहे.

गावांना दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. वेहेळगावच्या ३३ केव्हीच्या सबस्टेशन मधून होणारा वीज पुरवठा विस्कळीत होत असलयाने त्याचा हा परिणाम असल्याचे स्पष्टीकरण योजनेवरील उपअभियंता प्रकाश बोरसे यांनी दिले. वेहेळगावच्या ३३ केव्हीमध्ये वीज पुरवठा अनियमित झाला असला, तरी चौवीस तासातील सहा ते सात तास वीज नसली तरी उरलेल्या पंधरा तासासाठी झालेल्या वीज पुरवठ्याचे काय असा सवाल नांदगावच्या वीज वितरण विभागाचे सहाय्य्क कार्यकारी अभियंता मधुकर साळूंके यांनी उपस्थित केला.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार सध्या निर्माण झालेल्या गिरणा धरण पाणी पुरवठा योजनेच्या विस्कळीतपणाचा पुढील सप्तहात आढाव घेणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. 

ठळक मुद्दे 

  • नांदगाव शहराला आवर्तनाचा कालावधी प्रत्यक्ष चार दिवस 
  • मालेगाव तालुक्यातील ३९ गावांना आवर्तनाचा कालावधी प्रत्यक्ष चार ते पाच दिवस 
  • वस्तुस्थिती 
  • नांदगाव शहरात व सतरा गावांना होणारा पाणी पुरवठा अकरा ते पंधरा दिवसाआड 
  • मालेगाव तालुक्यातील ३९ गावांना तेरा ते वीस दिवसाआड पाणी पुरवठा 
  • माणिकपुंज मधून मृत साठ्यातून होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने आता केवळ गिरणा धरणावर निर्भर 
  • वेहेळगाव सबस्टेशन मधील ३३ केव्ही वारंवार नादुरुस्त 
  • गिरणा धारण उद्भव विहिरीतून दररोज १० दशल;क्ष पाण्याचा उपसा होण्यासाठीचा अडथळा त्यामुळे प्रत्यक्षात मिळणारे पाणी सह ते सात दशलक्ष एवढेच 
  • पाण्याचा डिस्चार्ज होत नसल्याने आवर्तन लांबते यातील वास्तव शोधू जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीष पवार यांचा निर्धार 
Web Title: 56 villages affected by Girna dam disrupted supply