Nandurbar News : राज्यातील 645 रोजंदारी कर्मचारी शासनसेवेत नियमित

645 daily wage workers in state are regular in government service nandurbar news
645 daily wage workers in state are regular in government service nandurbar newsesakal

Nandurbar News : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या दहा वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून, या निर्णयामुळे राज्यातील ६४५ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आल्याचे प्रतिपादन, राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) यांनी केले. (645 daily wage workers in state are regular in government service nandurbar news)

नंदुरबार येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सिअल स्कूल येथील प्रांगणात रोजंदारी पदावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आल्याचे नियुक्ती आदेशाचे वाटप कार्यक्रम पार पडला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार डॉ. हीना गावित, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल, सहाय्यक प्रकल्पाधिकारी संजय काकडे, सायरा बानू हिप्परगे, किरण मोरे, संजय चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित म्हणाले, की आज नंदुरबार प्रकल्पातील नंदुरबार, नवापूर, शहादा येथील ११३ वर्ग चार कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करून लाभ मिळणार असून, कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या तारखेपासून लागू करण्यात येईल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

645 daily wage workers in state are regular in government service nandurbar news
Unseasonal Rain : करंजाडी खोऱ्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते; शेतकऱ्यांची अवस्था बिकट

या वेळी खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी अनेक आंदोलने, निवेदने देण्यात आली होती. याचा पालकमंत्री डॉ. गावित यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात आले असून, आदिवासी विकास विभागातील दहा वर्षे पूर्ण झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला आहे.

645 daily wage workers in state are regular in government service nandurbar news
Nandurbar News : वडाळी परिसरात सूर्यफूल शेतीकडे कल; कमी खर्चात अधिकच उत्पन्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com