Unseasonal Rain : करंजाडी खोऱ्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते; शेतकऱ्यांची अवस्था बिकट

Farmer Baliram Jadhav showing onion found in hail to MLA Dilip Borse.
Farmer Baliram Jadhav showing onion found in hail to MLA Dilip Borse.esakal

Unseasonal Rain : करंजाडी खोऱ्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने बोलूही शकत नाहीत आणि सांगूही शकत नाही अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. मायबाप सरकारने शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी अशी आवळणी शेतकऱ्यांतून होत आहे. (Unseasonal Rain Karanjadi valley was not experiencing excessive rain nashik news)

करंजाडी खोऱ्यात शनिवारी (ता. ८) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने करंजाड, भडाणे, निताणे, पारनेर, बिजोटे, आनंदपूर तसेच गोराणे शिवारातील शेतीपिकांसह घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अनेक घरांचे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडले तर डाळींब, कांदा तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज महावितरण कंपनीचे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे रोहित्र व वीजवाहक खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

यामुळे गावातील पाणीपुरवठा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीशिवारातील पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करंजाडी परिसरातील शेतकरी करत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Farmer Baliram Jadhav showing onion found in hail to MLA Dilip Borse.
Nashik Unseasonal Rain : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीचे पुन्हा थैमान; शेतकरी उध्वस्त..

रविवारी (ता.९) सकाळी आमदार दिलीप बोरसे यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करत अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली.

पावसाने होत्याचे नव्हते केले

अवकाळी पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले. या परिसरात कांदा उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात असल्याने शंभर टक्के पिकांचे नुकसान आहे. काढणीस आलेला कांदा भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले आहेत. या सर्वांनी श्रीरामांना साकडे घालावे की, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई व मदत देण्याचे बळ दे अशी मागणी केली आहे.

Farmer Baliram Jadhav showing onion found in hail to MLA Dilip Borse.
Nashik Unseasonal Rain : अवकाळीचा पावणेसहा हजार हेक्टरवर फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com