Nandurbar News : वडाळी परिसरात सूर्यफूल शेतीकडे कल; कमी खर्चात अधिकच उत्पन्न

Blooming sunflower crop in the area.
Blooming sunflower crop in the area. esakal

Nandurbar News : परिसरात यंदा उन्हाळी हंगामात सूर्यफुलाची लागवड झाल्याचे पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पीक हातचे गेल्यामुळे बळीराजा हताश न होता परिसरातील शेतकऱ्यांनी जानेवारीच्या मध्यात सूर्यफुलाची लागवड केली आहे. (Trend towards sunflower farming in Wadala area nandurbar news)

सध्या पीक बहरलेल्या अवस्थेत आहे. वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे पीक कमी कालावधीत येणारे असून, सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांत हमखास येणारे पीक आहे. पाखरे, डुकरे सूर्यफुलाला खाऊ शकत नाही, खर्चदेखील कमी असतो.

सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर केला आहे. जानेवारीच्या मध्यात लागवड केलेले पीक तीन महिन्यांचे झाले असून, सध्या बहरलेल्या अवस्थेत आहे. सूर्यफुलाला भाव जास्त असला तरी उत्पन्न अधिक मिळते. सूर्यफुलाच्या बियांचा वापर रब्बी व उन्हाळी हंगामात प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Blooming sunflower crop in the area.
Unseasonal Rain : कसमादेत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; नांदगाव, देवळा, चांदवडला तालुक्यात गारपीट

सूर्यफुलाचे तेल गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. खाद्यतेलाचे वाढते भाव पाहता खाद्य तेलाच्या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. मागील काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यापासून खर्च वजा मिळणारा नफा पाहता या हंगामात सूर्यफुलाची लागवड शेतकऱ्यांनी केली असून, पीक सध्या बहरलेल्या अवस्थेत आहे.

"सूर्यफूल लागवडीतून उत्पादन खर्च वजा, नफा चांगला मिळतो. पाखरांपासून कुठलाही धोका नसतो. कमी कालावधीत येते, फवारणी व मजुरी लागत नाही. गव्हाप्रमाणे हार्वेस्टरने काढणी होते. भारतात तेलबिया मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. कमी पाण्यात सूर्यफूल येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढतोय." -अभय गोसावी, सूर्यफूल उत्पादक शेतकरी, वडाळी, ता. शहादा

Blooming sunflower crop in the area.
Success Story : अबब... 6 ते 7 फूट उंचीचे अळू! युवा शेतकरी गुजरातमध्ये करतोय पानांची विक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com