Dhule : 7 लाखांचा गुटखा जप्त; चालक ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seized Gutkha

Dhule : 7 लाखांचा गुटखा जप्त; चालक ताब्यात

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग शिवारात आज पहाटे येथील मोहाडी पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक (Illegal transport of gutkha) रोखली. वाहनातून सात लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

मालेगावकडे पिकअप (एमएच-१९/सीडब्ब्लू-४४७४) वाहनातून राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक असल्याची माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भूषण कोते यांना मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाईसाठी पथकाला रवाना केले. गस्त घालत लळींग गावशिवारात एका हॉटेलजवळ संशयित वाहनाला रोखले. चालकाने शुभम उमेश पवार (वय १९, रा. सावखेडे तुर्क, ता. पारोळा, जि. जळगाव) असे नाव सांगितले. वाहनातील मालाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळला. पोलिस पथकाने सहा लाख ९७ हजार २०० किमतीचा गुटखा व दोन लाखांचे वाहन जप्त केले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीनुसार चालकावर गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: Crime Alert : बँक कर्मचाऱ्याच्या घरीच घरफोडी

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भूषण कोते, बापू दाभाडे, बाबूलाल माळी, किरण कोठावदे, मुकेश जाधव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: भोंग्यावरून राजकारण चालणार नाही : मंत्री अस्लम शेख

Web Title: 7 Lakh Rupees Gutkha Seized Driver Is In Custody Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DhuleTransport
go to top