
बोगस बियाणे विक्री पकडण्यासाठी कृषी विभागाचे 7 भरारी पथके
शहादा (जि. नंदुरबार) : सालाबादाप्रमाणे जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने सात पथके गठित केली असली तरी बोगस अनधिकृत बियाणे विक्रीला वेळीच अटकाव बसावा यासाठी पथकाने कृषी केंद्रांची तपासणी करणे गरजेचे आहे. (7 squads of agriculture department to catch bogus seed sales)
जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री होते. हे गेल्या दोन -तीन वर्षांपासून पथकाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट होते. दरवर्षी गोपनीय माहिती मिळाल्यास कृषी विभागामार्फत छापे टाकून संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाते. परंतु कालांतराने पुन्हा हस्तक मार्फत अवैध बियाण्यांची विक्री सुरू होते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी पायबंद घालण्यात यावा अशी मागणी होत आहे.
हेही वाचा: विहीरखाली दबल्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; पिता बचावला
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हावेत म्हणून कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर एक तर तालुका स्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे सहा अशी एकूण सात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी हे भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पथकात उपविभागीय कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, निरीक्षक वजनमापे हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे.
तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून तर निरीक्षक वजन मापे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी हे सदस्य असतील. बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनधिकृत रित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.अधिकृत विक्रेत्याकडून बियाण्यांची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणाचे पाकिटांचे लॉट क्रमांक पडताळून पाहणे, अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये कीटकनाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा: गच्चीवर झोपण्यास गेले अन् चोरट्यांनी साधला डाव; 2 लाखाचा ऐवज लंपास
Web Title: 7 Squads Of Agriculture Department To Catch Bogus Seed Sales
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..