विहीरखाली दबल्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; पिता बचावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

विहीरखाली दबल्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; पिता बचावला

धुळे : मोरशेवडी (ता. धुळे) येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना माती धसून त्याखाली दबल्याने मायलेकाचा मृत्यू झाला, तर पिता बचावला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने पोकलँडने बचावकार्य सुरू केले. मात्र, ते पूर्ण होईपर्यंत या दुर्दैवी घटनेत मायलेक गतप्राण झाले होते.

मोरशेवडीत शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ही घटना घडली. तेथील खिरा झामा यांच्या शेतात विहीर खोदकामाचे काम नायडोंगरे (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील भिका छगन पवार (वय ४०), सुनीता भिका पवार (३९), श्याम भिका पवार (१०) यांना मिळाले. पवार कुटुंब विहीर खोदकामाचेच काम करतात. त्यानुसार त्यांनी मोरशेवडी शिवारात हे काम घेतले. या कुटुंबाने शुक्रवारी दिवसभर विहीर खोदकाम केले. यात सायंकाळी विहिरीच्या कठड्याचे काम सुरू असताना माती धसली. त्यामुळे मायलेकासह पिता खाली कोसळले. या घटनेत भिका पवार बचावले. मात्र, माय-लेक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.

हेही वाचा: गुरांना वाचविताना झाडावर आदळली कार; तिघांचा जागीच मृत्यू

ही घटना लक्षात येताच अनेक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक अधिकारी प्रकाश पवार व कर्मचारी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणीअंती माती हटविण्यासाठी तत्काळ पोकलँड मागविले. काम सुरू असताना पोकलँड बंद पडले. त्यात विहीर ढासळलेली असल्याने खाली उतरणेही शक्य नव्हते. नंतर शनिवारी सकाळी पुन्हा पोकलँड मागविण्यात आले. पोलिस अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाची वाहने, पोकलँडच्या सहाय्याने बचावकार्य सुरू झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. विहिरीचा तळ भुसभुशीत असल्यामुळे, तसेच माती अधिक असल्याने पोलिसांनी एकूण दोन पोकलँड मागविले. शनिवारी दुपारी उशिरापर्यंत माती बाजूला करण्याचे काम सुरूच होते. नंतर या घटनेत सुनीता पवार आणि श्याम या मायलेकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर पिता भिका पवार बचावले. या घटनेमुळे कर्ता पवार व नातेवाइकांना अश्रू अनावर झाले. त्यांना पोलिसांसह ग्रामस्थांकडून धीर दिला जाता होता. या घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली.

हेही वाचा: रस्ते अपघातातील जखमींना वाचविणारा ‘रावेर पॅटर्न’ला सुरुवात होणार

Web Title: Mother And Child Died When The Well Collapsed Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dhulemotherdeath
go to top