गच्चीवर झोपण्यास गेले अन् चोरट्यांनी साधला डाव; 2 लाखाचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update in satara theft cases breaking the lock of the closed flat stolen 1 lakh

गच्चीवर झोपण्यास गेले अन् चोरट्यांनी साधला डाव; 2 लाखाचा ऐवज लंपास


पिंपळनेर (जि. धुळे) : देशशिरवाडे (ता. साक्री) येथील जितेश पगारे पिंपळनेर सटाणा रोड वरील घरात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अंदाजे एक लाख ९८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

देशशिरवाडे (ता. साक्री) येथील जितेश शांताराम पगारे यांचे पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील घरात गुरूवारी (ता.१२) घराच्या गच्चीवर सहकुटुंब झोपण्यासाठी गेले असता चोरांनी ही संधी साधली. शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता मधल्या खोलीतले कपाट उघडे दिसले. त्यातून चोरांनी तीन तोळ्याची मंगल पोत, आठ ग्रॅमचे टोंगल व कानातले टॅप्स, चांदीच्या साखळ्या असा एकूण अंदाजे एक लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून नेला. याबाबत जितेश पगारे यांनी पिंपळनेर पोलिसात तक्रारी अर्ज दिला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Jalgaon : 2 मुलांच्या आईने अखेर मृत्युला कवटाळले

हेही वाचा: रस्ते अपघातातील जखमींना वाचविणारा ‘रावेर पॅटर्न’ला सुरुवात होणार

Web Title: Burglary In Deshshirwade Worth Rs 2 Lakh Looted Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top