Nandurbar Grampanchayat Election : शहादा तालुक्यात 49 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी पोटनिवडणूक जाहीर

 grampanchayat election update
grampanchayat election update sakal

Nandurbar News : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या ५९ सदस्यांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २५ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरून त्याची प्रत निवडणूक कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ मेस पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची माहिती शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली. (Nandurbar Grampanchayat Election 49 Gram Panchayats in Shahada Taluka By poll election announced for 59 members news)

ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर निधन, राजीनामा, अर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शहादा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींतील ५१ प्रभागांतून ५९ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.

निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मंगळवारपासून सुरवात झाली असून, २ मेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुटी वगळता नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 grampanchayat election update
Nashik Market Committee Election : बाजार समितीचे 30 हजार मतदार आज ठरविणार कारभारी

३ मेस दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. ८ मेस नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत राहणार असून, १८ मेस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येईल. दुसऱ्या दिवशी १९ मेस सकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरासे यांनी दिली.

या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

सावखेडा, करजई, बुपकरी, मलोनी, असलोद, टेंभली, पाडळदा बुद्रुक, कमरावद, शोभानगर, लांबोळा, वढे त.श., डामरखेडा, कानडी त.श., औरंगपूर, तऱ्हाडी त.बो., पळसवाडा, परिवर्धा, कानडी त. ह. मडकाणी, तलावडी, अमोदा, सुलवाडे, लक्कडकोट, खेडदिगर, दुधखेडा, पिंपर्डे, कोचरा, कुरंगी, कर्जांत, चांदसैली, टवळाई, मलगाव, मंदाणा, ओझरटा, जावदे त.ह., भोंगरा, वडगाव, लंगडी-भवानी, खापरखेडा, काकर्दे-दिगर व कोंढावळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 grampanchayat election update
Dhule Market Committee Election : आज मतदान; साडेसहा हजारांवर मतदार बजावतील हक्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com