
Dhule News : धुळे उत्पादन शुल्काच्या इमारतीस 9 कोटी मंजूर
धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येथील कार्यालयीन इमारत (Building) बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (9 crore sanctioned for excise duty building dhule news)
याकामी पाठपुराव्याअंती एकूण आठ कोटी ८९ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. ()
ते म्हणाले, की नवीन इमारत होण्यासाठी शासनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. सार्वजनिक बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करून शासनाला पाठविण्याची सूचना दिली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नियोजित इमारतीच्या बांधकामासाठी मान्यता द्यावी आणि निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती.
या कार्यालयास स्वतःची इमारत नसल्याने भाड्याच्या इमारतीत कामकाज करावे लागते. शिरपूर तालुका मध्य प्रदेशाच्या सीमेवर असल्याने उत्पादन शुल्क विभागाला कायम दक्ष राहावे लागते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
या विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यावसायिकांना कामकाज सोयीचे होण्यासाठी धुळे शहरात उत्पादन शुल्काच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयासाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत होण्याची गरज पटवून दिली.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहाडी उपनगरात गट क्रमांक १४७/१ येथे ८० आर जमीन उपलब्ध करून दिली असून, ती उत्पादन शुल्क विभागाच्या नावे झाली आहे.
जमिनीच्या आजूबाजूला झोपडपट्टीवजा घरे असल्याने तेथे भविष्यात अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीच्या बांधकामाचीही गरज आहे. याकामी निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली. ती मान्य झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.