Jalgaon News : औद्योगिक कॉरिडोर, रस्त्यांसाठी हवे 500 कोटी; उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे

Dr. Radheshyam Chaudhary
Dr. Radheshyam Chaudharyesakal

जळगाव : रस्त्यांची झालेली चाळण लक्षात घेता संपूर्ण जळगाव शहरात रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी पाचशे कोटी एकरकमी द्यावेत, पोटेन्शिअल असूनही केवळ उपेक्षेमुळे मागे राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क,

केळीप्रक्रिया उद्योगांसह औद्योगिक कॉरिडोर घोषित करावा. त्यादृष्टीने विकासाचा रोडमॅप आखणे गरजेचे आहे, असे साकडेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालण्यात आले आहे. (500 crore needed for development roadmap industrial corridor roads jalgaon news)

भाजपचे सरचिटणीस डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी श्री. फडणवीस यांना याबाबत विस्तृत निवेदन दिले. मंत्री गिरीश महाजन यांना भेटून त्यांनीही यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती डॉ. चौधरी यांनी केली. राज्याचा अर्थसंकल्प येणाऱ्या अधिवेशनात सादर होईल. त्यादृष्टीने जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने डॉ. चौधरी यांनी प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले आहे.

अशा आहेत मागण्या

-जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योग येण्यासह सध्याच्या उद्योगांना सवलतीची गरज आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्याच्या धर्तीवर वीजबिलात सवलत मिळावी.

-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या रखडलेल्या पाडळसरे प्रकल्पाला भरीव निधी द्यावा

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Dr. Radheshyam Chaudhary
Jalgaon News : वडगावला चाऱ्याअभावी गायींचे हाल; दानशूरांनी चारा दान करण्याचे आवाहन!

वैभव असलेल्या चटई उद्योगाची स्थिती दयनीय आहे, त्याला वाचविण्यासाठी निर्यात करात सूट, उद्योगाला चालना देणारे धोरण आखावे

-मुख्यमंत्री असताना, आपण व गिरीश महाजनांच्या प्रयत्नाने मंजूर वैद्यकीय संकुलाच्या (मेडिकल हब) तरतूद करून ते पूर्ण करावे

-जिल्ह्यातील पद्मालय, उनपदेव, मुक्ताई मंदिर, झुलते मनोरे या तीर्थक्षेत्रे व ऐतिहासिक स्थळांसह हतनूर, वाघूर, निंबादेवी धरण आदींना जोडून विशेष पर्यटन सर्किट विकसित करावे

-‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ योजनेंतर्गत केळीवरील प्रक्रिया उद्योगांसाठी मदत करावी

Dr. Radheshyam Chaudhary
Jalgaon News : बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com