अभिजित बागड यांची रोटरीच्या उपप्रांतपालपदी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सटाणा : येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अभिजित बागड यांची सन २०१८ - १९ साठी रोटरीच्या उपप्रांतपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी श्री. बागड यांना नियुक्तीचे पत्र दिले.

बागड हे गेल्या १६ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ देवमामलेदारचे सक्रीय सदस्य असून डीस्ट्रीक्त रोटरीच्या विविध कमिट्यांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. सन २०१३ - १४ या वर्षी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी नऊ विविध पारितोषिके मिळविण्याचा बहुमान मिळविला होता. ग्रामीण भागात रोटरी क्लबच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 'बेस्ट प्रेसिडेंट' अवार्ड ने गौरविण्यात आले होते. रोटरीतील अत्यंत मानाच्या 'पॉल हेरीस फेलोशिप' ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. येथील देवमामलेदार भक्त परिवारातील ते सदस्य असून लाडशाखीय वाणी समाज मंडळावर ते संचालक म्हणूनही काम बघत आहेत. लहान मोठ्या संस्थांना ते नेहमी सामाजिक भावनेतून आर्थिक मदत करीत असतात. त्यांच्या या नियुक्तीचे शहर व तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे. 

Web Title: abhijit bagad appointed as deputy principal for rotary