Nandubar News : गैरहजर तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालयातच उपस्थित राहावे लागणार; शासनाचे निर्देश

तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून त्यांना बैठकांसाठी निमंत्रित करावयाचे असल्यास या बैठका सकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
nandurbar collector office
nandurbar collector office esakal

तळोदा : तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून त्यांना बैठकांसाठी निमंत्रित करावयाचे असल्यास या बैठका सकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. दुपारच्या कामकाजाच्या सत्रात त्यांना आपल्या कार्यालयात उपस्थित राहता यावे म्हणून २५ जानेवारीला शासनाने हे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे बैठकांच्या नावावर दिवसभर गैरहजर राहणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आता आपल्या कार्यालयात उपस्थित राहावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. (Absentee Talathi Board Officers have to attend office itself Government directives nandurbar administration news)

तलाठी व मंडळ अधिकारी तालुकास्तरावरील अत्यंत महत्त्वाची पदे आहेत. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांना तलाठी व मंडळ कार्यालयाशी संपर्क करावा लागतो. शेतकऱ्यांशी संबंधित ईपीक पाहणी नोंदणी.

नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती याप्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करण्यासाठी शासनाचा दुवा म्हणून काम करणे, तसेच सर्व महसुली कामे करणे इत्यादीसाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे पाहिले जाते.

अनेक ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत असतात. दुसरीकडे त्यांना अनेक ठिकाणी बैठकांसाठी जावे लागते.

त्यात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या बैठका दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात येत असल्याने बैठकीस उपस्थित राहण्याकरिता संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी सकाळपासूनच त्यांच्या मुख्यालयात उपस्थित नसल्याची बाबदेखील शासनाच्या निदर्शनास आली आहे.

nandurbar collector office
Nandurbar News : जिल्ह्यात प्रथमच कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

त्यामुळे जनतेची गैरसोय होत असल्याची बाब निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी, उपविभागीय व तहसील कार्यालय आणि त्यांच्याकडील आयोजित केलेल्या बैठकीस तलाठी व मंडळ अधिकारी यांना निमंत्रित करावयाचे असल्यास या बैठका सकाळच्या सत्रात आयोजित कराव्यात व बैठकीनंतर तलाठी व मंडळ अधिकारी दुपारच्या कामकाजाच्या सत्रात त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

बैठक असल्याचे दाखवून बैठकांच्या नावावर सकाळपासूनच गैरहजर राहणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आता गैरहजर राहताना विचार करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

एकापेक्षा अधिक सज्जांचा कार्यभार

अनेक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक तलाठी सज्जांचा कार्यभार असल्याचे दिसून येते. त्यामुळे कामाचा व्याप वाढल्यानेदेखील तलाठी व मंडळ अधिकारी कामाचे नियोजन स्वतःच्या पातळीवर करीत असल्याचे बोलले जाते.

त्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यात यावीत तसेच एक किंवा दोन सज्जांचेच कार्यभार तलाठ्यांकडे असावेत, अशीदेखील अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

nandurbar collector office
Nandurbar News : बंजार समाजाला 15 फेब्रुवारीपूर्वी गोड बातमी : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com