Nandurbar News : बंजार समाजाला 15 फेब्रुवारीपूर्वी गोड बातमी : गिरीश महाजन

मुंबई येथे पर्यटन व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्‍नांविषयी चर्चा करण्यात आली.
Minister Girish Mahajan speaking at a meeting of office bearers of Banjara community
Minister Girish Mahajan speaking at a meeting of office bearers of Banjara communityesakal

Nandurbar News : मुंबई येथे पर्यटन व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्‍नांविषयी चर्चा करण्यात आली.

या चर्चेअंती लवकरच समाजाचे प्रश्‍न मार्गी लागतील व येणाऱ्या संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीपूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२४ पूर्वी बंजारा समाजाला निश्‍चितपणे गोड बातमी देणार, असे आश्‍वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. (Girish Mahajan statement Good news for banjara community before 15th February nandurbar news)

अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सर्वप्रथम गोदरी महाकुंभ घडवून आपण बंजारा समाजाला फक्त देशातच नाही तर विदेशापर्यंत लौकिक मिळवून दिला म्हणून बंजारा समाजातर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व रामेश्‍वर नाईक यांचे आभार मानले व बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या श्री. महाजन यांना चव्हाण यांनी सांगितल्या.

प्रमुख मागण्यांमध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी (१५ फेब्रुवारी) शासकीय सुटी जाहीर करावी, राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना सरसकट (कुठल्याही अटीविना) महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात याव्यात.

वसंतराव नाईक तांड वस्ती सुधार योजनेवर संपूर्ण महाराष्ट्रात अशासकीय सदस्य तातडीने नियुक्त करावेत, राज्यातील पालिका, महापालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतसुद्धा स्वीकृत सदस्य घेण्यात यावेत.

जातीचे दाखले व जातपडताडणी प्रमाणपत्रावरील जाचक अटी रद्द कराव्यात, राज्याच्या धर्तीवर केंद्रीय संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार योजना लागू करावी.

Minister Girish Mahajan speaking at a meeting of office bearers of Banjara community
Nandurbar News : नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावावा : डॉ. हीना गावित

उत्तर महाराष्ट्रातील बंजारा/वंजारी या शब्दांच्या अपभ्रंशामुळे जातीचा दाखला देताना अडचणी निर्माण होतात, ते दूर करण्यासाठी खानदेशातील संपूर्ण बंजारा शेतकऱ्यांच्या सातबारावर बंजारा असा उल्लेख करण्यात यावा याचा समावेश आहे.

बैठकीस पोहरा देवी येथील महंत कबीरदास महाराज, चैतन्य परिवाराचे श्याम चैतन्य महाराज, समाजाचे युवा नेते रामेश्‍वर नाईक, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, राष्ट्रीय महासचिव शरद राठोड.

माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजेश राठोड, अरुण चव्हाण, फुलसिंग नाईक, डॉ. आकाश राठोड, कांतिलाल नाईक, ॲड. पंडित राठोड, प्रा. पी. टी. चव्हाण, अरुण चव्हाण, जितेंद्र पवार यांच्यासह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Minister Girish Mahajan speaking at a meeting of office bearers of Banjara community
Nandurbar News : जिल्ह्यात प्रथमच कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com