लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

चाळीसगाव - वारसा हक्काने मिळालेल्या शेतीची खातेफोड करून सात-बारा करण्यासाठी कळमडू (ता. चाळीसगाव) येथील तलाठी ज्ञानेश्‍वर सूर्यभान काळे याने तब्बल पन्नास हजारांची मागणी केली. त्यापैकी दहा रुपयांची लाच स्वीकारताना त्याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

तक्रारदाराच्या पणजोबांना सरकारकडून राजमाने (ता. चाळीसगाव) शिवारात पूर्वी शेतजमीन मिळाली होती. ही वारसा हक्काने चुलत काका व चुलत भाऊ यांच्या नावावर झाली होती. त्यांचे वारस लावून त्याची खातेफोड करण्यासाठी तक्रारदाराने तलाठी काळे याची भेट घेतली. "तुमचे प्रकरण जुने आहे, त्याला भरपूर खर्च येईल', असे सांगून तलाठ्याने साठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. 

Web Title: Accepting bribes, arrested talathi

टॅग्स