अंजनेरीजवळील अपघातात भाविक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, अपघातानंतर त्र्यंबकेश्‍वर पोलीस न फिरकल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.

       हैदराबाद येथील काही भाविक हे शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. शिर्डीतील दर्शन झाल्यानंतर त्यांना त्र्यंबकेश्‍वरला यायचे होते. त्यासाठी त्यांच्याकडील स्वत:च्या बलोने कार आणि एक कार शिर्डीतून भाड्याने केली. या दोन्ही कारमधून ते त्र्यंबकेश्‍वर येथे रविवारी (ता.23) दुपारी पोहोचले. दर्शन घेतल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते परत नाशिकमार्गे शिर्डीला परतण्यासाठी निघाले. दोन्ही कार त्र्यंबकेश्‍वरमधून एकाचवेळी निघाल्या. त्र्यंबकरोडवरील अंजनेरी येथील वळणावर भाड्‌याने केलेली कार पुढे होती तर पाठीमागे त्यांची बलोने कार होती. पाठीमागे असलेल्या याच बलेनो कारला त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील कारने (एमएच 15 जीएल 5757) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की धडक देणाऱ्या कारने दुभाजकावरून तीन-चार पलट्या घेतल्या.
       या अपघातामध्ये हैदराबादच्या भाविकांच्या कारमधील एक जण साईनाथ (पूर्ण नाव-पत्ता नाही) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना एका खासगी वाहनातून तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. तर अपघातग्रस्त दोन्ही कारमधील जखमींना सातपूर, गंगापूर रोड परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळविल्यानंतरही त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. तर स्थानिक नागरिकांनीच मदतकार्य करीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near Anjineri, 1 devotee Killed