मनमाड निंबाळा गावाजवळ पिकअप व्हॅनचा अपघात, २० महिला जखमी  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मनमाड - मनमाड लासलगाव रोडवर निंबाळा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २० महिला जखमी झाल्या. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी मालेगावला पाठविले आहे. जखमी झालेल्या सर्व महिला मजूर असून, यात लहान मुलींचा देखील समावेश आहे. सर्वजण कांदे लावण्यासाठी जात होते. 

दुष्काळाचा दाह वाढत असल्याने पिण्यास पाणी नाही त्यामुळे पिके जगवायची कशी आशा परिस्थिती पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांना हाताला काम नसल्याने कामासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. अशाच कांदे लावण्याच्या कामासाठी बाहेर गावी जाणाऱ्या २० महिला मजुरांच्या एम एच ०६ एजी २५६९ या क्रमांकाच्या पिकअपला अपघात झाला. 

Web Title: accident near manamad nibala, 20 woman injured

टॅग्स