सिकंदराबाद - शिर्डी एक्सप्रेसचा अपघात थोडक्यात टळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वरील रेल्वे रुळाला आज सकाळी तडा गेला. अमोल पगारे या गँगमॅनला रुळाला गेलेला तडा वेळीच दिसल्याने त्याने प्रसंगावधान राखून या रुळावरून जाणारी सिकंदराबाद - शिर्डी काकींनाडा एक्सप्रेस वेळीच थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वरील रेल्वे रुळाला आज सकाळी तडा गेला. अमोल पगारे या गँगमॅनला रुळाला गेलेला तडा वेळीच दिसल्याने त्याने प्रसंगावधान राखून या रुळावरून जाणारी सिकंदराबाद - शिर्डी काकींनाडा एक्सप्रेस वेळीच थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. रुळाची दुरुस्ती करणाऱ्या पथकाने फिशप्लेट लावून दुरुस्ती केली. त्यानंतर या रुळावरून काकींनाडा एक्स्प्रेससह इतर गाड्या सोडण्यात आल्या तर, इतर गाड्या दुसऱ्या फलाट वरून सोडल्या जात आहे. वाढत्या थंडीमुळे रुळाला तडा गेल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. 

मनमाड रेल्वे स्थानक एक महत्वाचे जंक्शन असल्याने या स्थानकावरून देशभरातील सुमारे १४३ गाड्या दररोज ये-जा करतात तर, हजारो प्रवाशी या स्थानकावरून दररोज प्रवास करत असतात. मात्र सध्या कडाक्याची थंडीची लाट सुरू असल्याने याचा परिणाम रेल्वेलाही झालेला दिसतो. आज सकाळी स्थानकावरील फलाट क्रमांक पाच वरील रुळाला अचानक तडा गेल्याची घटना घडली. मात्र, रुळाला तडा गेल्याचा प्रकार कामावर असलेल्या अमोल पगारे या गँगमॅनच्या लक्षात आल्याने प्रसंगावधान राखून या रुळावरून जाणारी सिकंदराबाद - शिर्डी काकींनाडा एक्सप्रेस वेळीच थांबवली. त्यामुळे पूढे होणारा मोठा अनर्थ टळला.

सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. अपघात टळला गेला रुळाला तडा गेल्याचा प्रकार लक्षात येताच गँगमन पगारे यांनी तात्काळ विलंब न करता हा प्रकार वरिष्ठ  यांच्या लक्षात आणून दिला त्यांनी सदर प्रकार संबधित विभागला कळविला असता समाजात रेल्वे प्रशासन खडबडुन जागे झाले. रुळाची दुरुस्ती करणारे पथक तत्काळ घटनास्थळी  दाखल झाले. रुळालाचा तडा दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले. या दुरुस्तीमुळे या मार्गावरून होणारी रेल्वे गाड्यांची वाहतूक  इतर फलाटाच्या मार्गावरून वळण्यात आली.  दुरुस्ती पथकाने तडा गेलेल्या रुळाला फिशप्लेट लावून दुरुस्ती केली. त्यानंतर या रुळावरून काकींनाडा एक्स्प्रेससह इतर गाड्या सोडण्यात आल्या तर, इतर गाड्या दुसऱ्या फलाट वरून सोडल्या जात आहे.
वाढत्या थंडीमुळे रुळाला तडा गेल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले असून मनमाडचा पारा ५ अंशा पर्यंत आल्यामुळे थंडीत वाढ झाली असून त्याचा फटका रेल्वे रुळांना देखील बसत आहे.
  

Web Title: accident of Sikandarabad- Shirdi Express's just avoided