Dhule News : जनावरे चोरून नेणाऱ्या कारचा अपघात
धुळे : जनावरे चोरी करून कत्तलीसाठी नेणाऱ्या भरधावचा कारचा शहरातील पारोळा रोडवरील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ अपघात (Accident) झाला. त्यात गाय व बैल ठार झाला, तर चार जण जखमी झाले. संशयित एकजण पोलिसांना पाहून पसार झाला. (accident speeding car carrying animals for slaughter near Government Veterinary Clinic dhule news)
आझादनगर पोलिसांचे पथक शुक्रवारी (ता. ३) पहाटे सव्वातीनच्या सुमारास पारोळा रोडवरून पेट्रोलिंग करताना त्यांच्या वाहनाला एक कार ओव्हरटेक झाली. मात्र शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संरक्षण भिंतीलगत अपघात होऊन कार उलटली.
पोलिसांनी मदतीसाठी वाहन थांबविले असता त्यांना पाहून कारमधील एका संशयिताने पलायन केले. वाहनात चार जण जखमी अवस्थेत, तर दोन गायी व एक बैल मिळून आले. त्यातील एक गाय व बैल जागीच मृत्युमुखी झाले.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
चौघांनी त्यांची नावे रशीद शफीक शेख (रा. अंबिकानगर, चाळीसगाव रोड, धुळे), मोहम्मद सलीम शब्बीर अहमद (रा. शंभर फुटी रोड, जामचा मळा, फातमा मशिदीजवळ, धुळे), सय्यद रसूल सय्यद सत्तार (रा. वडजाई रोड, काझी प्लॉट, गल्ली क्रमांक २, धुळे) व शशिकांत सदाशिव मोरे (रा. दंडेवालाबाबानगर, तिखी रोड, मोहाडी) अशी सांगितली.
पळून गेलेल्या साथीदाराचे नाव अफजल ऊर्फ डल्ल्या (रा. अंबिकानगर, धुळे) असे सांगितले. पाचही जणांनी गाय व बैल चोरून आणून निर्दयपणे पाय बांधून त्यांना कार (एमएच ०४, डीएन ३७४१)मध्ये कोंबून वाहतूक करीत होते.
यादरम्यान भरधाव वाहन चालवून अपघात करून वाहनातील एक गाय व एक बैल यांच्या मृत्यूस तसेच स्वत:च्या व एका गायीच्या दुखापतीस जबाबदार ठरले. त्यामुळे पाच संशयितांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.