Dhule News : कॉपर केबल चोरटा जेरबंद; तिरंगा चौकातील चोरट्याचा कारनामा

seized copper cable suspect
seized copper cable suspectesakal

धुळे : सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या टॉवरमधील कॉपर केबल लांबविणाऱ्या चोरट्याला निजामपूर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ट्रकसह बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. (Police arrested thief who extended copper cable from wind mill tower of Suzlon Company Goods worth 12 lakhs seized dhule news)

निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या तीन टॉवरमधील वीजवाहनासाठी लावलेली सव्वादोन लाखांची ४८० मीटर कॉपर केबल चोरट्यांनी लंपास केली होती. त्यासंबंधी सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड यांनी तपासकामी पथक तयार केले. पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

तसेच पथकातील दीपक वारे यांना घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल धुळे येथील शेख आबीद शेख रसूल (रा. तिरंगा चौक, धुळे) याने चोरी केल्याचे समजले. त्यावरून पथकाने संशयित आबीदला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातील तिरंगा चौकात ट्रकमध्ये (एमएच १९, झेड ५२९६) मुद्देमाल लपविल्याचे सांगितले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

seized copper cable suspect
Dhule Mahamarathon : मॅरेथॉन ‘हिट’ होण्यासाठी धुळेकर सज्ज; स्पर्धकांना रविवारची प्रतीक्षा!

ट्रकची तपासणी केली असता चार लाख ४० हजारांची कॉपर केबल व पवनचक्की टॉवरचे इतर साहित्य आढळले. आठ लाखांचा ट्रक व चार लाख ४० हजारांची केबल असा बारा लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शाखाली निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड, दीपक वारे, श्री. मालचे, श्री. माळी, राकेश महाले, होंडे यांनी केली.

seized copper cable suspect
Dhule News : खडीक्रशरकडे 25 कोटींचा महसूल थकीत; वीजपुरवठा खंडित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com