Nandurbar Crime: आरोपी न्यायालयाच्या आवारातून सिनेस्टाइल स्कॉर्पिओतून फरारी; शहाद्याचे 2 पोलिस निलंबित

 suspend
suspendesakal

Nandurbar Crime : न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या डोळ्यासमोर गंभीर गुन्ह्यातील आरोपी नातेवाइकांच्या मदतीने फरारी झाल्या प्रकारणी शहादा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सहदेव आराक, हवालदार राजेंद्र देवीदास पारोळेकर व पोलिस शिपाई योगेश संजय सोनवणे या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख पी. आर. पाटील यांनी बजावले आहेत. (Accused Abscond From Court Premises In Scorpio 2 policemen of Shahada suspended Nandurbar Crime)

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सहदेव आराक यांच्याकडे तपासावर असलेला गुन्ह्यातील आरोपी ओम प्रकाश ऊर्फ ओमाराम किसनाराम जाट (रा. सियोली कि ढानी, भोजापूर बायतू, जि. बाडमेर, राज्य जस्थान) याची ८ मे २०२३ ला पोलिस कस्टडी रिमांड मुदत संपत असल्याने त्यास प्रथमवर्ग न्यायालात १४ दिवस न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर होण्याबाबत न्यायालयात हजर करण्यासाठी

असई पारोळेकर व सोनवणे यांच्यासह हजर करून न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केल्याने त्यास असई पारोळेकर व सोनवणे न्यायालय आवारात बेडी लावत असताना आरोपीने त्यांच्या हातास झटका देऊन साक्षीदाराशी झटापटी करून जोरात लाथाबुक्क्यांनी मारून खाली पाडले.

श्री. सोनवणे यांच्या पायाला व हाताला जबर दुखापत करून शासकीय कामात अडथळा करत विनाक्रमांकाच्या स्कॉर्पिओतील व्यक्तींशी पूर्व नियोजित कट करून न्यायालयाच्या आवारातून स्कॉर्पिओ वाहनातून पळून गेला.

घटना घडल्यानंतर फरारी आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये पथके पाठविली मात्र तो सापडला नाही. या घटनेनंतर जिल्हा पोलिसप्रमुख पाटील यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली.

शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुखांनी शहादा पोलिस ठाणे व शहादा न्यायालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व या संपूर्ण प्रकारणाची चौकशी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 suspend
Bhiwandi Crime : पत्नी झोपेत असताना पतीकडून लाकडाने प्राणघातक हल्ला; हॉस्पिटलमध्ये सोडून गेला निघून

जबाब नोंदविले व पोलिस ठाण्यात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी सराईत असल्याची माहिती असूनदेखील आरोपीस अटक केल्यापासून ते न्यायालयात हजर करेपावेतो घ्यावयाचा काळजीसंदर्भात सर्वोच्च न्यायालय तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात हलगर्जी व निष्काळजीपणाचे वर्तन केले.

ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन केले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख पाटील यांनी केलेल्या चौकशीत शहादा पोलिस ठाण्यातील कर्मचारी दोषी आढळून आल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सहदेव आराक यांचे निलंबन मुख्यालय पोलिस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे राहील.

त्यांनी पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) नंदुरबार यांच्याकडे दररोज हजेरी नोंदवावी, तसेच असई राजेंद्र देवीदास पारोळेकर व पोलिस शिपाई योगेश संजय सोनवणे यांचे निलंबन मुख्यालय हे पोलिस मुख्यालय, नंदुरबार येथे राहील.

त्यांनी रा.पो.नि.पो.मु. नंदुरबार यांच्याकडेस दररोज हजेरी नोंदवावी. त्यांना पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) नंदुरबार यांच्या लेखी पूर्वअनुमतीशिवाय नंदुरबार येथून अन्यत्र जाता येणार नाही, असे आदेश दिले आहेत.

 suspend
Pune Crime: धक्कादायक! वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com