तंटामुक्ती समितीच्या उपाध्यक्षांवर खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप

दिगंबर पाटोळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

वणी (नाशिक) : येथील तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सतिश जाधव यांच्यावर 
ग्रामिण रुग्णालयाच्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. कोमल चौरे यांनी खोटी फिर्याद दाखल केल्याचा आरोप करुन संबधीत वैद्यकिय अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोलिसांत केली आहे.

वणी (नाशिक) : येथील तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सतिश जाधव यांच्यावर 
ग्रामिण रुग्णालयाच्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. कोमल चौरे यांनी खोटी फिर्याद दाखल केल्याचा आरोप करुन संबधीत वैद्यकिय अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोलिसांत केली आहे.

येथील लेंडीपूरा भागातील किरण कल्लु महाले या युवकाचा मृतदेह (ता. १४) वणी शिवारातील शेतविहिरीत आढळला होता. विहिरीतून मृतदेह काढल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी येथील ग्रामिण रुग्णालयात आणला होता. दरम्यान मृताचे नातेवाईक व परीसरातील रहिवासी हे ग्रामिण रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता. यावेळी नातेवाईकांनी मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेसारखा असल्याने व त्याचा वास सुटल्यामूऴे लवकर शवविच्छेदन करुन आमच्या ताब्यात द्या अशी मागणी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. चौरे यांच्याकडे केली होती.

यावेळी डॉक्टरांनी तो जिवंत नाही ना, तो मेलेलाच आहे, इतकी गर्दी का करतात, वेळ लागेल म्हणून निघून गेल्याचे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते सतिश जाधव यांनी याबाबची माहिती देवून रुग्णालयात बोलावून घेतले. यावेळी जाधव यांनी वैद्यकिय अधिकारी रुग्णालयात नसल्याने भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधला मात्र फोन स्विकारला नाही. त्यानंतर मॅडम काही कालावधीनंतर शवविच्छेदन करुन शवविच्छेदन गृहाबाहेर आल्या असता. सतिश जाधव यांनी मॅडम फोन केला होता. एवढेच बोलल्याने मॅडमला राग येवून त्यांनी श्री. जाधव यांच्यावर खोटी तक्रार देवून गुन्हा दाखल केल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत लेंडीपूरा भागातील संबधीत मृताचे कुटुंब, नातोवाईक व परीसरातील महिलांसह शंभरावर रहिवाशांनी पोलिस ठाण्यात जावून सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ सानप यांना निवेदन दिले.

Web Title: Accused of lodging a false complaint against the Deputy Chairman of the Tantamukti Samiti